मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hazaar Vela Sholay Pahilela Manus : ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’; सिद्धार्थ जाधवचा नवा हटके चित्रपट!

Hazaar Vela Sholay Pahilela Manus : ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’; सिद्धार्थ जाधवचा नवा हटके चित्रपट!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2024 04:25 PM IST

Hazaar Vela Sholay Pahilela Manus : ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या नावातूनच ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतंय.

Hazaar Vela Sholay Pahilela Manus
Hazaar Vela Sholay Pahilela Manus

Hazaar Vela Sholay Pahilela Manus: हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटाने लोकप्रियतेचे मापदंड बदलले. इतकंच नाही तर, या चित्रपटाने अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आता ‘शोले’ या चित्रपटाच्या याच प्रतिमेला मानवंदना देणारा ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा नवा कोरा हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या हटके चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे रिलीज करण्यात आल. नुकतेच मुंबई फेस्टिवल येथे या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते.

‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या नावातूनच ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं. पण, चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शोले चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच ‘शोले’ हा चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. ‘शोले’ चित्रपटाच्या याच आठवणींना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट सलाम करणार आहे. या चित्रपटाची पहिली घोषणा चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९मध्ये करण्यात आली होती. मात्र, कोरोन महामारीमुळे चित्रपटाचं शेड्युल गडबडलं होतं. मात्र, आता या चित्रपटाला पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे.

Marathi Serial TRP: ‘सायली’ने मारली बाजी तर, ‘अरुंधती’ पुन्हा पिछाडीवर! पाहा तुमच्या आवडत्या मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

केवळ कथानकच हटके नाही तर, या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून, अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असला तरी, अद्याप याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. चित्रपटाच्या ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या हटके नावामुळे आता सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर, जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे.

WhatsApp channel