Diljit Dosanjh Concert Tickets Price: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझची फॅन फॉलोइंग बरीच मजबूत आहे. त्याची गाणी देशातच नव्हे, तर परदेशातही चांगलीच पसंत केली जातात. दिलजीत केवळ त्याच्या आवाजाच्या जोरावर नाही, तर त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्यांची गाणी ऐकण्यासाठी चाहते कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. सध्या दिलजीत त्याच्या दिल इल्युमिनाटी इंडिया टूरमुळे चर्चेत आहे. व्हँकुव्हर, डलास, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, लॉस एंजेलिसनंतर आता भारतात हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
प्रसिद्ध अभिनेता आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ त्याच्या चित्रपट आणि गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्याची फॅन फॉलोइंगही जोरदार आहे. त्याला ऐकण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जातात. दिलजीत दोसांझच्या 'दिल-लुमिनाटी टूर'च्या इंडिया लेगची सर्व तिकिटे गुरुवारी काही मिनिटांतच विकली गेली. यानंतर अनेकांनी तिकिटांच्या वाढीव किमतीवरून दिलजीतला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
१० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या प्री-सेलदरम्यान दिलजीत दोसांझच्या आगामी कॉन्सर्टची १ लाखांहून अधिक तिकिटे अवघ्या १५ मिनिटांत विकली गेली. हा स्वत:च एक मोठा विक्रम आहे. कनेक्ट सिनेला दिलेल्या मुलाखतीत दिलजीतची मॅनेजर सोनाली सिंहने खुलासा केला की, दिल-लुमिनाती टूरदरम्यान दिलजीतने त्याच्या अमेरिकन शोमधून २३४ कोटी रुपये कमावले होते. या कॉन्सर्टमध्ये कितीतरी लोक कमी किंमतीत तिकिटे विकत घेतात आणि चढ्या भावाने विकतात, असेही सोनालीने सांगितले.
दिलजीत दोसांझची मॅनेजर सोनाली पुढे म्हणाली की, "काही लोकांनी ६४००० डॉलर (५४ लाख रुपये) आणि ५५००० डॉलरची (४६ लाख रुपये) तिकिटे रिसेलमध्ये खरेदी केली आहेत. या तिकिटांची किंमत एवढी अधिकृत नव्हती, पण लोक आधी तिकिटे विकत घेतात आणि नंतर दुसऱ्याला विकतात, असा विचित्र ट्रेंड इथे आहे. तर आता अबुधाबीतील दिलजीतचे चाहते त्याच्या परफॉर्मन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. अबुधाबीतील त्यांच्या लुमिनाती टूरसाठी सुमारे ३०,००० तिकिटे विकली गेली. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही भारतीय कलाकाराच्या कॉन्सर्टसाठीची विकली गेलेली ही सर्वाधिक तिकिटे आहेत. भारतभरातील १० शहरांमध्ये दिल-लुमिनाती कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. शोचा शेवटचा दौरा २९ डिसेंबर २०२४ रोजी गुवाहाटी येथे होणार आहे.