Jau Bai Gavaat Top 5 Finalist: छोट्या पडद्यावर एका नवाकोरा अन् आगळावेगळा असा 'जाऊ बाई गावात' हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता हार्दिक जोशी यांच्या हाती देण्यात आली. या शोमध्ये शहरात आणि परदेशात सगळ्या सुखसुविधांचा वापर करून लहानाच्या मोठ्या झालेल्या काही तरुणी थेट गावात जाऊन कुठलीही सुविधा न वापरता तिथल्या लोकांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान अनेकदा वादांच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. 'जाऊ बाई गावात'च्या निमित्ताने हार्दिक जोशी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसला. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या कार्यक्रमात विजेती कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'जाऊ बाई गावात' या अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे. या फिनाले आठवड्यात स्थान मिळविणारे टॉप ५ स्पर्धक आहेत ‘रमशा फारुकी’, ‘रसिक ढोबळे’, ‘संस्कृती साळुंके’, ‘स्नेहा भोसले’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’. महाअंतिम सोहळ्याचा गावकऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह निर्माण झाला आहे.
वाचा: तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रॅपरला झाली अटक, काय आहे प्रकरण?
मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, 'जाऊ बाई गावातचे' हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सीझनच्या विजेत्याचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर खास पाहुणे बनून येणार आहेत सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, त्यांचा सोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर. सोनालीचा दिलेला मजेशीर टास्क स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणार असणार आहे.
संबंधित बातम्या