अभिनेता हार्दिक जोशी हा कायम चर्चेत असतो. कधी त्याच्या मालिका व चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. मागील वर्षी हार्दिकच्या वहिनीचे निधन झाले. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. आता वहिनीच्या आठवणीत हार्दिकने भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून हार्दिक आणि त्याच्या वहिनीचे जवळचे नाते असल्याचे पाहायला मिळते. हार्दिकसोबतच त्याची पत्नी आणि अभिनेत्री अक्षया देवधरने देखील पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वहिनीच्या आठवणीत पोस्ट लिहित काही फोटो शेअर केले आहेत. 'आज 24 नोव्हेंबर तुला जाऊन एक वर्ष पुर्ण झालं पण आजही तुझी उणीव सतत जाणवते आणि ती कायम जाणवत राहणार, तुझ्या गोड आठवणी तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहेत आणि कायम आमच्या सोबत राहणार...' असे हार्दिक म्हणाला.
पुढे हार्दिक जाऊ बाई जोरात कार्यक्रमाविषयी म्हणाला, "माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि 'जाऊ बाई गावातचा' पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तिला नमस्कार करून करतो."
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...
झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेने हार्दिकला लोकप्रियता मिळवून दिली. तो संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. त्यानंतर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत हार्दिक झळकला होता. दरम्यान जाऊ बाई गावात या कार्यक्रमाचं श्रेयही हार्दिकने त्याच्या वहिनीला दिलं होतं.