Republic Day 2024 Best Patriotic Songs: येत्या २६ जानेवारीला आपल्या देशात ७५वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा केला जाणार आहे. भारतातील प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस खूप खास आहे. याच कारण म्हणजे, याच दिवशी भारताला संविधान मिळाले आणि म्हणूनच लोक हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. ध्वजवंदन झाल्यानंतर वेगवेगळा खाऊ वाटून, गाणी वाजवून हा दिवस साजरा केला जातो. बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय तर हा दिवस अधुराच आहे.
क्लासिक चित्रपट ‘रोजा’मधील ‘भारत हमसे जान से प्यारा है’ हे गाणे प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. या गाण्यातून भारतीय असण्याचा खरा काय हे सांगितले गेले आहे. या गाण्यात विविध ठिकाणे आणि धर्मांमधील एकतेबद्दल बोलले गेले आहे.
शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाचे शीर्षकगीत देशभक्तीपर गाण्यांच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी असते. सुखविंदर सिंहच्या आवाजातील ‘चक दे.. हो.. चक दे इंडिया’ हे गाणे सर्वांनाच आवडते. हे गाणे ऐकल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा संचारते.
देशभक्तीपर चित्रपटांच्या यादीत सर्वात वर येणारे नाव म्हणजे 'रंग दे बसंती'. चित्रपटाचे शीर्षक गीत खूप दमदार आहे. हे गाणं इतकं मनमोहक आहे की ते ऐकून सगळेच नाचायला लागतात. हे गाणे दलेर मेहंदीने गायले आहे आणि महिला आवाज सुचित्राने दिला आहे, हे गाणे खूपच अप्रतिम आहे.
‘माँ तुझे सलाम’ या गाण्याची प्रत्येकाच्या हृदयात एक खास जागा आहे. एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचा व्हिडीओ भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्यात आला आहे. या गाण्याचे बोल ऐकताच प्रत्येक भारतीय रोमांचित होतो.
आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या ‘राजी’ चित्रपटातील ‘ए वतन’ हे गाणे देखील देशभक्तीपर गीत आहे. चित्रपटातील हे गाणे सुनिधी चौहानने गायले असून, या गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत. या गाण्यातून आपल्या देशाप्रती प्रेम व्यक्त केले गेले आहे.
देशभक्तीपर गाण्यांचा विषय निघाला आणि त्यात ‘स्वदेस’ चित्रपटाचा उल्लेख होणार नाही, हे कसं शक्य आहे. शाहरुख खानच्या देशभक्ती दाखवणाऱ्या ‘स्वदेस’ या चित्रपटातील ‘ये जो देश है मेरा’ हे गाणे अतिशय अप्रतिम गाणे आहे. हे गाणे एआर रहमानने गायले आहे.