Yami Gautam Birthday: आयएएस बनण्याचं स्वप्न बघणारी यामी गौतम मनोरंजन विश्वात कशी आली? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yami Gautam Birthday: आयएएस बनण्याचं स्वप्न बघणारी यामी गौतम मनोरंजन विश्वात कशी आली? वाचा...

Yami Gautam Birthday: आयएएस बनण्याचं स्वप्न बघणारी यामी गौतम मनोरंजन विश्वात कशी आली? वाचा...

Nov 28, 2023 07:37 AM IST

Happy Birthday Yami Gautam: आपण आयएएस अधिकारी व्हायचं आणि आपल्या देशाची सेवा करायची, असं स्वप्न यामीने पाहिलं होतं. मात्र, तिच्या नशिबाने तिच्यासाठी वेगळी वाट आधीच निवडून ठेवली होती.

Yami Gautam Birthday
Yami Gautam Birthday

Happy Birthday Yami Gautam: छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करून मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री म्हणून यामी गौतम हिचं नाव घेतलं जातं. मनोरंजन विश्वात कोणताही गॉडफादर नसताना केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर इथवर पोहोचलेली अभिनेत्री यामी गौतम आज (२८ नोव्हेंबर) आपला ३५वा वादिवस साजरा करत आहे. २८ नोव्हेंबर १९८८ रोजी हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर या गावात यामी गौतम हिचा जन्म झाला. लहानपणापासूनच यामीला आयएएस ऑफिसर बनायचे होते. मात्र, तिने मनोरंजन विश्वाची वाट धरली आणि बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला.

आपण आयएएस अधिकारी व्हायचं आणि आपल्या देशाची सेवा करायची, असं स्वप्न यामीने पाहिलं होतं. मात्र, तिच्या नशिबाने तिच्यासाठी वेगळी वाट आधीच निवडून ठेवली होती. एकेदिवशी यामीच्या वडिलांचा मित्र आणि त्यांची पत्नी घरी आहे होते. यामीच्या वडिलांच्या मित्राची पत्नी ही टीव्ही अभिनेत्री होती. तिची नजर यामीवर पडली आणि यामीचं नशीबच पालटलं. वडिलांच्या मित्राच्या पत्नीनेच यामीला अभिनेत्री बनण्यासाठी थिएटर जॉईन करण्याचा सल्ला दिला होता. यावेळी त्यांनी यामीचे काही फोटो काढून ते मुंबईतील एका प्रॉडक्शन हाऊसला पाठवून दिले होते.

Dharmaveer 2 Poster: ‘साहेबां’च्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार; सुरू होणार 'धर्मवीर २'चा प्रवास!

वडिलांच्या मित्राच्या पत्नीने दिलेला सल्ला आजमावून पाहू म्हणून यामीने मॉडेलिंगची सुरुवात केली होती. याच दरम्यान तिला पहिल्यावहिल्या टीव्ही मालिकेची ऑफर मिळाली. 'चांद के पार चलो' या मालिकेसाठी यामीला विचारणा झाली आणि तिने लगेच होकार देखील कळवला. या मालिकेनंतर यामीच्या वाट्याला आणखी एक मालिका आली. या मालिकेचं नाव 'प्यार ना होगा कम' असं होतं. या टीव्ही मालिकांमधून यामी घराघरांत पोहोचली. या दरम्यान तिने केलेली 'फेअर अँड लवली'ची जाहिरात देखील गाजत होती.

सगळं काही सुरू असताना यामीने आपला मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला. २०१२मध्ये यामी गौतम हिला अभिनेता आयुष्मान खुराणा याच्यासोबत 'विक्की डोनर' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा हा चित्रपट कमी बजेटचा असला तरी तुफान गाजला होता. या नंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. यामी गौतम हिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत 'टोटल स्‍यापा', 'अॅक्‍शन जॅक्‍सन', 'बदलापुर', 'काबिल', 'दसवीं', 'उरी' आणि 'बाला'सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२१मध्ये यामीने दिग्दर्शक-निर्माता आदित्य धर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

Whats_app_banner