मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urmila Matondkar Birthday: कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरचं करिअर ‘या’मुळे झालं उद्ध्वस्त!

Urmila Matondkar Birthday: कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरचं करिअर ‘या’मुळे झालं उद्ध्वस्त!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 04, 2024 08:45 AM IST

Happy Birthday Urmila Matondkar: सगळं काही छान सुरू असतानाच दुधात माशी पडल्याप्रमाणे उर्मिला मातोंडकरच्या करिअरला उतरती कळा लागली.

Urmila Matondkar Birthday
Urmila Matondkar Birthday

Happy Birthday Urmila Matondkar: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज (४ फेब्रुवारी) तिचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. ४ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत जन्मलेली उर्मिला ९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. तिने इंडस्ट्रीत भरपूर नाव कमावले होते. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तिच्या मोहक सौंदर्यामुळे ओळखली जात होती. चित्रपट दिग्दर्शकही उर्मिलाच्या सौंदर्याचे दिवाने असायचे. सगळं काही छान सुरू असतानाच दुधात माशी पडल्याप्रमाणे उर्मिलाच्या करिअरला उतरती कळा लागली.

उर्मिला मातोडकरने १९८१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलयुग’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर उर्मिला मातोंडकरला १९८३मध्ये प्रदर्शित झालेल्या शेखर कपूरच्या 'मासूम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील तिच्या चित्रित केलेले 'लकडी की काठी, काठी पे घोडा' हे गाणे आजही मुलांमध्ये लोकप्रिय आहे. दरम्यान, उर्मिला मातोडकरने छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्येही काम केले.

‘रंगीला’ने मिळवून दिली ओळख!

१९८९मध्ये उर्मिला मातोंडकरला कमल हासनसोबत ‘चाणक्य’ या मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. उर्मिला मातोंडकरने १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नरसिम्हा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. हा संपूर्ण चित्रपट सनी देओल आणि ओम पुरी यांच्याभोवती फिरत होता. पण, उर्मिला मातोंडकरने तिच्या शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'रंगीला' हा चित्रपट उर्मिला मातोंडकरच्या करिअरसाठी महत्त्वाचा चित्रपट ठरला. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात उर्मिला मातोंडकरने एका डान्सरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात उर्मिला मातोंडकरसोबत आमिर खान झळकला होता. उर्मिलाने या चित्रपटात बोल्ड सीन्स करून प्रेक्षकांना रोमांचित केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

Tharala Tar Mag 3rd Feb: अर्जुन आणि सायलीचा हनिमून पाहून प्रियाचा होतोय जळफळाट; आता नवा डाव रचणार!

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबतचे नाते कुणापासून लपलेले नाही. राम गोपाल वर्माच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात उर्मिला होती. उर्मिला आणि राम गोपाल वर्माच्या अफेअरच्या बातम्या तेव्हापासून येऊ लागल्या, जेव्हा त्याने माधुरी दीक्षितला त्याच्या एका चित्रपटातून काढून टाकले आणि उर्मिलाला साइन केले होते. दोघांनी १३ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. उर्मिला आणि राम गोपाल वर्मा चित्रपटांदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले.

प्रेमात पडणं पडलं महागात!

पण, राम गोपाल वर्माच्या प्रेमात पडणंही उर्मिलाला चांगलंच महागात पडलं. त्यांच्या नात्याच्या बातम्या सर्वत्र येऊ लागल्या. एकीकडे राम गोपाल वर्मामुळे उर्मिलाची कारकीर्द खूप उंचीवर पोहोचली, तर दुसरीकडे तिच्या फिल्मी करिअरच्या घसरणीचे कारणही राम गोपाल वर्माच ठरले. राम गोपाल वर्मासोबत काम केल्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी उर्मिलाला चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता. कारण राम गोपाल वर्मा यांच्यासोबत इंडस्ट्रीतील अनेकांचे राम गोपाल वर्मासोबत वाद होते. तर, दुसरीकडे या अफ़ेअरबद्द्ल कळताच राम गोपाल वर्मची पत्नी चिडली आणि तिने उर्मिलाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर उर्मिलाला कोणताच आधार मिळू शकला नाही. चित्रपट न मिळाल्याने उर्मिलाचे संपूर्ण फिल्मी करिअर उद्ध्वस्त झाले आणि ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर, वयाच्या ४२व्या वर्षी अभिनेत्रीने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले.

WhatsApp channel

विभाग