Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती 'ही' अट!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती 'ही' अट!

Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती 'ही' अट!

Published Dec 29, 2023 07:40 AM IST

Happy Birthday Twinkle Khanna: ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा जोडप्यांपैकी एक आहेत, जे सगळ्यांनाच कपल गोल्स देत असतात. त्यांची प्रेमकथा देखील खूप मनोरंजक आहे.

Happy Birthday Twinkle Khanna
Happy Birthday Twinkle Khanna

Happy Birthday Twinkle Khanna: नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना आज (२९ डिसेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. वडील राजेश खन्ना आणि आई डिंपल कपाडिया हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार असल्याने अभिनयाचा वारसा तिला जन्मजातच मिळाला होता. अक्षयसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकलने तिच्या अभिनय कारकिर्दीला कायमचा रामराम केला होता. अभिनय विश्वापासून दूर गेली असली, तरी ट्विंकल लेखक आणि इंटिरियर डिझायनर म्हणून सक्रिय आहे. अक्षय आणि ट्विंकल यांची प्रेमकहाणी देखील अगदी फिल्मी आहे. एका मोठ्या अटीवर दोघांचं लग्न झालं होतं.

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा जोडप्यांपैकी एक आहेत, जे सगळ्यांनाच कपल गोल्स देत असतात. त्यांची प्रेमकथा देखील खूप मनोरंजक आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचे लग्न २००१मध्ये झाले. मात्र, त्याआधी अक्षय कुमार ट्विंकल खन्नासोबत एक वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. अर्थात लिव्ह इनमध्ये राहणं हीच त्यांची अट होती. ही अट त्यांना स्वतः डिम्पल कपाडिया यांनी घातली होती. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांची पहिली भेट एका फोटोशूट दरम्यान झाली होती. त्यावेळी ट्विंकल खन्ना हीच नुकताच ब्रेकअप झाला होता. अशा परिस्थितीत अक्षयने तिला खूप साथ दिली. इथून दोघांचाही एकमेकांकडे ओढ वाढू लागला. दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. मात्र, त्यांच्या लग्नाचा मार्ग सोपा नव्हता. त्यावेळी ट्विंकल तिच्या करिअरच्या शिखरावर होती.

Tharala Tar Mag 28th Dec: सायली-अर्जुनची चोरी पकडली जाणार? 'ठरलं तर मग'च्या कथेत येणार मोठा ट्विस्ट

ट्विंकलचा 'मेला' हा चित्रपट २००० साली प्रदर्शित होणार होता, त्यामुळे अभिनेत्री म्हणाली की, जर हा चित्रपट हिट झाला तर ती लग्न करणार नाही आणि जर तो फ्लॉप झाला तर ती अक्षयशी लगेच लग्न करेल. आता, 'मेला' चित्रपट हिट होणार याची ट्विंकलला खात्री होती. मात्र, एक योगायोग असा घडला की हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर ट्विंकलने अक्षयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला

अक्षय कुमार जेव्हा, ट्विंकलची आई डिम्पल कपाडियाकडे मुलीचा हात मागण्यासाठी गेला, तेव्हा त्यांनी त्याला एक अट घातली होती. लग्नापूर्वी अक्षय कुमारला जवळपास एक वर्ष ट्विंकलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहावे लागेल. जर यात ते यशस्वी झाले, तर त्यांना लग्न करता येईल, असे डिम्पल कपाडिया यांनी म्हटले होते. डिम्पल कपाडिया यांच्या या अटीमुळे अक्षय कुमार आश्चर्यचकित झाला होता. मात्र, त्यांनी ही अट मान्य करून पूर्ण करून दाखवली होती.

Whats_app_banner