मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कधीकाळी झेललाय बॉडी शेमिंगचा त्रास, आता तिच्या फिगरनेच लावलीय इंटरनेटवर आग! वाचा तेजस्वी प्रकाशबद्दल...

कधीकाळी झेललाय बॉडी शेमिंगचा त्रास, आता तिच्या फिगरनेच लावलीय इंटरनेटवर आग! वाचा तेजस्वी प्रकाशबद्दल...

Jun 10, 2024 07:57 AM IST

आज हॉट दिसणाऱ्या तेजस्वी प्रकाशने एकेकाळी बॉडी शेमिंगचा त्रास सहन केला आहे. याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.

कधीकाळी झेलालय बॉडी शेमिंगचा त्रास, आता तिच्या फिगरनेच लावलीय इंटरनेटवर आग!
कधीकाळी झेलालय बॉडी शेमिंगचा त्रास, आता तिच्या फिगरनेच लावलीय इंटरनेटवर आग!

टीव्ही मालिका 'स्वरागिनी' मधून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री आणि 'बिग बॉस १५'ची विजेती तेजस्वी प्रकाश हिच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज ही अभिनेत्री तिचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने एक दिवस आधीच आपला खास दिवस साजरा करायला सुरुवात केली होती. तिने तिच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसली होती. अभिनेत्री फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसली आहे. आज हॉट दिसणाऱ्या तेजस्वी प्रकाशने एकेकाळी बॉडी शेमिंगचा त्रास सहन केला आहे. याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. शालेय जीवनात तिला अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागायचे.

ट्रेंडिंग न्यूज

शालेय दिवसांची आठवण करून देताना तेजस्वी प्रकाशने सांगितले की, ती लहानपणी खूपच बारीक होती. यामुळे तिला अनेकवेळा बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले होते. तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, 'लहानपणी मी खूप सडपातळ होते. माझे वर्गमित्र मला हँगर ऑन म्हणून चिडवायचे. अनेकवेळा त्यांनी माझी चेष्टा केली, खिल्ली उडवली. जेव्हा मी खेळाच्या तासाला खेळायला जायचे, तेव्हा मला टीममध्ये देखील घेत नव्हते. त्यांना वाटायचे की, मी धावू शकत नाही आणि मी खाली पडेन.’

राखी सावंतला बळजबरी चुंबन ते डॉक्टरला दिलेली थप्पड! गायकच नाही काँट्रोव्हर्सी किंग आहे मिका सिंह!

तेजस्वीने सांगितले की, 'माझ्या वर्गातील मुले म्हणायची की, तू हवेत उडू नये म्हणून पाच रुपयांचे नाणे खिशात घेऊन चाल. मला त्यावेळी खूप वाईट वाटायचे. मी माझा आत्मविश्वास गमावू लागले होते.’ तेजस्वीला शालेय जीवनात बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले असले, तरी आज जग तिच्या कर्वी फिगर आणि सौंदर्याचे दिवाने आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या मादक फोटोंनी भरलेले आहे.

तेजस्वी प्रकाश अनेक टीव्ही शोचा भाग बनली आहे. 'स्वरागिनी' मालिकेमधून पदार्पण करणारी ही अभिनेत्री एकता कपूरच्या 'नागिन ६' या हिट शोचा भागही आहे. या शोने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. याशिवाय तेजस्वी प्रकाश 'पहरेदार पिया की'मध्ये देखील दिसली होती. या शोमध्ये लहान मुलाशी लग्न केल्यामुळे तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे निर्मात्यांना हा शो मध्यातच थांबवावा लागला होता. याशिवाय तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस १५’ आणि ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या रिॲलिटी शोमध्येही झळकली आहे. 'बिग बॉस १५'ची विजेती ठरलेली तेजस्वी प्रकाश या शो दरम्यान प्रेमात पडली होती. अभिनेता करण कुंद्रासोबत तिचे नाते या शोमध्ये सुरू झाले, जे आता शोमधून बाहेर पडल्यानंतरही कायम आहे. तेजस्वी आणि करण यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या, पण त्या केवळ अफवा ठरल्या. आता चाहतेही या जोडप्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४