मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tanushree Dutta Birthday: अवघ्या २०व्या वर्षी तनुश्री दत्ताने जिंकली होती ‘मिस इंडिया’ स्पर्धा; वाचा अभिनेत्रीबद्दल...
Tanushree Dutta
Tanushree Dutta

Tanushree Dutta Birthday: अवघ्या २०व्या वर्षी तनुश्री दत्ताने जिंकली होती ‘मिस इंडिया’ स्पर्धा; वाचा अभिनेत्रीबद्दल...

19 March 2023, 7:41 ISTHarshada Bhirvandekar

Happy Birthday Tanushree Dutta: भारतात ‘मी टू’ मोहिमेची सुरुवात करणारी तनुश्री दत्ता नेहमीच चर्चेत राहिली. जाणून घेऊया अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी...

Happy Birthday Tanushree Dutta: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आज (१९ मार्च) आपला वाढदिवस साजरा करत आहे. तनुश्री दत्ता एके काळी लाखो हृदयांची धडकन बनली होती. एका गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 'आशिक बनाया आपने' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या तनुश्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. तिच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. पण, तनुश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली होती. भारतात ‘मी टू’ मोहिमेची सुरुवात करणारी तनुश्री दत्ता नेहमीच चर्चेत राहिली. जाणून घेऊया अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री तनुश्री दत्ताचा जन्म १९ मार्च १९८४ रोजी झारखंडमधील हिंदू बंगाली कुटुंबात झाला. तनुश्री अभ्यासात प्रचंड हुशार होती. मात्र, तिने स्वतःचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले होते. यानंतर तिने मनोरंजन विश्वाकडे वळण्याचा निर्णय घेतला. तनुश्री दत्ता वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी मिस इंडिया बनली होती. इतकेच नाही तर, तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, या स्पर्धेत तनुश्रीला फक्त टॉप १०मध्येच स्थान मिळवता आले.

तनुश्री दत्ता पहिल्यांदा ‘चॉकलेट’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, या चित्रपटाने तिला फारसे यश मिळवून दिले नाही. परंतु, ‘आशिक बनाया आपने’ या दुसऱ्या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. २००५मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिक बनाया आपने’ हा चित्रपट इमरान हाश्मी, सोनू सूद आणि तनुश्री यांच्या करिअरमध्ये खूप गाजला होता. यानंतर तनुश्री ‘रकीब’, ‘ढोल’, ‘रिस्क’, ‘गुड बॉय-बॅड बॉय’ या काही चित्रपटात तनुश्री झळकली होती. मात्र, तनुश्रीने एकाच चित्रपटातून खूप नाव कमावले. यानंतर तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत.

यानंतर तनुश्री दत्ताने २०१०मध्ये मनोरंजन विश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. २०१२मध्ये तिचे मुंडण केलेले फोटो खूप व्हायरल झाले होते. यानंतर तिने मनोरंजन विश्वातून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. तिने मनोरंजन विश्वातून काढता पाय घेऊन लडाखमध्ये प्रयाण केले होते. तनुश्री काही काळ लडाखमध्ये राहून अध्यात्मात रमली होती. त्यानंतर ती अमेरिकेत गेली आणि एका आश्रमात राहू लागली. यानंतर ती भारतात परतली आणि मी टू मोहिमुळे प्रचंड गाजली.

विभाग