Suresh Wadkar Birthday: असं काय झालं की सुरेश वाडकर यांनी एआर रहमानसाठी गाणी न गाण्याचा निर्णय घेतला? वाचा किस्सा-happy birthday suresh wadkar what happened that suresh wadkar decided not to sing for ar rahman ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suresh Wadkar Birthday: असं काय झालं की सुरेश वाडकर यांनी एआर रहमानसाठी गाणी न गाण्याचा निर्णय घेतला? वाचा किस्सा

Suresh Wadkar Birthday: असं काय झालं की सुरेश वाडकर यांनी एआर रहमानसाठी गाणी न गाण्याचा निर्णय घेतला? वाचा किस्सा

Aug 07, 2024 07:54 AM IST

Happy Birthday Suresh Wadkar: सुरेश वाडकर यांनी'रंगीला' चित्रपटातील गाणी गायल्यानंतर पुन्हा एआर रहमानसोबत काम केले नाही.

Suresh Wadkar Birthday
Suresh Wadkar Birthday

Happy Birthday Suresh Wadkar: भावगीत, भक्तीगीत असो वा एखादं रोमँटिक गाणं सुरेश वाडकर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने नेहमीच सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. सुरेश वाडकर यांनी अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. मात्र, या दरम्यान त्यांनी एआर रहमानसोबत त्यांनी अवघी एक-दोन गाणीच केली. त्यानंतर त्यांनी एआर रहमानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली काम करण्याची प्रत्येक गायकाची इच्छा असते. पण, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना एआर रहमानची काम करण्याची पद्धत आवडत नाही. त्यामुळेच सुरेश वाडकर यांनी'रंगीला' चित्रपटातील गाणी गायल्यानंतर पुन्हा एआर रहमानसोबत काम केले नाही.

संगीतकार एआर रहमानचा'रोजा' हा चित्रपट अनेक भाषांमध्ये डब झाला होता. त्याच्या मराठी आवृत्तीतील सर्व गाणी सुरेश वाडेकर यांनी गायली आहेत.'रोजा' हिट झाल्यानंतर सुरेश वाडकरांना एआर रहमानची ओळख झाली. पण, मद्रास (चेन्नई) येथे रेकॉर्डिंग करताना सुरेश वाडकर पहिल्यांदा एआर रहमान यांना भेटले, तेव्हा त्यांना पाहून धक्काच बसला. सुरेश वाडेकर म्हणाले की, 'काहीवर्षांपूर्वी एआर रहमान यांना भेटलो, तेव्हा मी त्यांना दिलीप म्हणून ओळखत होतो.'रोजा'ची गाणी हिट झाली तेव्हा एआर रहमान नावाचा नवा संगीतकार आहे, हे मला माहीत होतं. पण दिलीप हा एआर रहमान आहे हे मला माहीत नव्हतं.’

तो दुपारी उठतो!

संगीतकार एआर रहमान यांच्या'रंगीला' चित्रपटात सुरेश वाडेकर यांनी कविता कृष्णमूर्तीसोबत'प्यार जाने ये कैसा है, क्या कहे ये कुछ ऐसा है' गायले होते. सुरेश वाडेकर सांगतात, 'एक दिवस मला मद्रास येथून फोन आला की ए आर रहमानच्या चित्रपटात एक गाणे आहे. एआर रहमानचे नाव मी ऐकले होते. कारण त्याचा'रोजा' हा चित्रपट हिट झाला होता. तिथे गेल्यावर लक्षात आले की, त्याची दिनचर्या खूप वेगळी होती. तो दुपारी उठतो आणि २ वाजल्यापासून रात्री ३-४पर्यंत काम करतो.’

Gharoghari Matichya Chuli: हृषिकेशला सत्य समजलं अन् धक्काच बसला! सावत्रपणाची कीड रणदिवेंचं घर पोखरणार?

सुरेश वाडेकर म्हणतात, 'एआर रहमान समोर आल्यावर मी त्याला पाहून आश्चर्यचकित झालो आणि ओरडलोच, अरे दिलीप तू? गीतकार मेहबूब यांनी मला सांगितले की, हे रहमान साहेब आहेत. तेव्हा मला कळले की दिलीपने इस्लाम स्वीकारला आहे. दिलीप रहमान झाला आहे. ही माझ्यासाठी धक्कादायक गोष्ट होती. त्याने मला'प्यार जाने ये कैसा है, क्या कहे ये कुछ' ची धून वाजवून दाखवली. ती मला आवडली. यानंतर त्याने मला दुसऱ्या गाण्यासाठी बोलावले, पण त्याची काम करण्याची पद्धत मला आवडली नाही.’

आमच्यात वाद झाले आणि...

एका मुलाखतीत सुरेश वाडेकर म्हणतात, 'जेव्हा एआर रहमानने दुसऱ्यांदा गाण्यासाठी बोलावले तेव्हा त्याच्या असिस्टंटने त्या गाण्याचे रेकॉर्डिंग करून घेतले. गाणी रेकॉर्ड केल्यानंतर साधना आणि मी सरगम ​​हॉटेलमध्ये गेलो, तेव्हा एआर रहमान रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले आणि त्यांना गाण्यांमध्ये काही बदल करायचे होते. या प्रकरणावरून आमचा आणि त्यांचा थोडा वाद झाला. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी स्वतः उपस्थित राहायला हवे होते. बरं, त्या घटनेनंतर त्यांनी मला फोन केला नाही किंवा मी पुन्हा एआर रहमानसाठी गाणे गायले नाही. तो खूप हुशार आहे, चांगले काम करतो.पण त्याची काम करण्याची पद्धत मला आवडत नाही.’

विभाग