Sunil Grover Birthday: कधीकाळी कमवायचा अवघे ५०० रुपये; ‘या’ चित्रपटातून सुनील ग्रोव्हरने केलेली करिअरची सुरुवात!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunil Grover Birthday: कधीकाळी कमवायचा अवघे ५०० रुपये; ‘या’ चित्रपटातून सुनील ग्रोव्हरने केलेली करिअरची सुरुवात!

Sunil Grover Birthday: कधीकाळी कमवायचा अवघे ५०० रुपये; ‘या’ चित्रपटातून सुनील ग्रोव्हरने केलेली करिअरची सुरुवात!

Published Aug 03, 2023 07:28 AM IST

Happy Birthday Sunil Grover: 'कॉमेडी नाईट विथ कपिल' या शोमधील त्याने साकारलेले 'गुत्थी' हे पात्र लोकांना खूप आवडले होते. त्याचा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला होता.

Sunil Grover
Sunil Grover

Happy Birthday Sunil Grover:द कपिल शर्मा शो’चं नाव घेतलं की, डोळ्यांसमोर येणारं पहिलं पात्र म्हणजे ‘गुत्थी’. या ‘गुत्थी’च्या भूमिकेत झळकलेला अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर. या भूमिकेने त्याला घराघरांत ओळख मिळवून दिली होती. अभिनेता सुनील ग्रोव्हर आज (३ ऑगस्ट) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सुनील ग्रोव्हरने टीव्हीसोबतच अनेक चित्रपट आणि अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये तो झळकला आहे. पण, सुरुवातीपासूनच हे यश त्याच्या पदरी पडलं नाही. हे यश मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.

अभिनेता सुनील ग्रोव्हरचा जन्म १३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यात झाला. त्याने १९९८मध्ये अभिनेता अजय देवगनच्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर तो २००२मध्ये 'लिजेंड ऑफ भगत सिंह' या चित्रपटात दिसला होता. मात्र, 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा'मधून सुनील ग्रोव्हरला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली.

Aai Kuthe Kay Karte: अनिषचे आई-वडील दोघांनाही घेऊन जाणार इंदौरला? मालिकेत रंजक वळण

आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढताना अभिनेता सुनील ग्रोव्हर याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘एक वेळ होती, जेव्हा मी फक्त ५०० रुपये कमावत होतो. पण मला विश्वास होता की, मी नक्की यशस्वी होईन.’ सुनील ग्रोव्हरने या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याने अनेक वेळा नकार पचवले, तो हरला, पडला...पण त्याने कधीच हार मानली नाही. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. आज तो एक यशस्वी अभिनेता आहे.

'कॉमेडी नाईट विथ कपिल' या शोमधील त्याने साकारलेले 'गुत्थी' हे पात्र लोकांना खूप आवडले होते. त्याचा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. सुनील ग्रोव्हरने साकारलेल्या 'गुत्थी'ला जे प्रेम मिळालं, ते फार कमी विनोदवीरांच्या वाट्याला येतं. या शोच्या यशानंतर सुनीलने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने साकारलेले ‘रिंकू भाभी’ हे पात्र असो वा ‘डॉ. मशहूर गुलाटी’ सगळ्यांनाच चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

Whats_app_banner