Happy Birthday Sunidhi Chauhan: देशातील प्रतिभावान आणि सुंदर गायिका सुनिधि चौहान आज (१४ ऑगस्ट) तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनिधिने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी व्यावसायिक गाणी गाण्यास सुरुवात केली होती. सुनिधिने १९९६मध्ये ‘शास्त्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, १९९९मध्ये 'मस्त' चित्रपटासाठी तिने गायलेले 'रुकी रुकी सी जिंदगी' हे गाणे तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरले. २०००च्या दशकात बॉलिवूड संगीतात मोठा बदल झाला. गाण्यांसोबतच आयटम साँग्सची संख्या वाढू लागली. सुनिधिसाठी हा बदलही चांगला ठरला होता. कारण, महिला गायकांमध्ये सुनिधि चौहान ही एकमेव अशी गायिका होती, जी अशी आयटम साँग्सही सुंदरपणे सादर करू शकली. तिच्या सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली आहे.
रोमँटिक गाण्यांपासून ते चार्टबस्टरपर्यंत, सुनिधिने तिच्या कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये ३०००हून अधिक गाणी गायली आहेत. सुनिधि चौहान केवळ पार्श्वगायिकाच नाही, तर एक उत्तम कलाकार देखील आहे. तिचे शो देश-विदेशात हाऊसफुल्ल होत असतात. चला तर मग, आजच्या 'बर्थडे गर्ल' आणि प्रसिद्ध गायिका सुनिधि चौहानच्या टॉप १० अविस्मरणीय गाण्यांवर एक नजर टाकूया, जी प्रेक्षकांना ऐकायला नेहमीच आवडतात.
‘धूम ३’ चित्रपटातील कतरिना कैफवर चित्रित केलेले प्रसिद्ध गाणे सुनिधि चौहानने गायले होते.
सुनिधि चौहानने गायलेले ‘शीला की जवानी’ हे गाणेही कतरिना कैफवर चित्रित करण्यात आले आहे. अक्षय कुमारचा ‘तीसमार खान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नसला, तरी हे गाणे आजही कार्यक्रमांमध्ये वाजताना दिसते.
‘हनीमून एक्सप्रेस’ चित्रपटातील हे गाणे अभय देओल आणि मिनिषा लांबा यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.
करीना कपूरच्या ‘चमेली’ या चित्रपटातील ‘भागे रे मन’ हे गाणे सुनिधि चौहानने गायले आहे.
अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडीस यांच्या ‘हाऊसफुल’ या चित्रपटातील सुनिधि चौहानने गायलेले ‘आपका क्या होगा जनाब-ए-आली’ गाणे खूप गाजले होते.
ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव यांच्या ‘फन्ने खान’ या चित्रपटातील सुनिधिने गायलेलं ‘हल्का हल्का सुरूर है’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे.