Sonali Kulkarni Unknown Facts : आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज (३ नोव्हेंबर) तिचा ५०वा वादिवस साजरा करत आहे. मराठी असोवा हिंदी ते अगदी साऊथपर्यंत सोनालीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. साधारणतः ज्या वयात मुले आपल्या करिअरचा विचार करायला सुरुवात करतात, त्या वयात सोनालीने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिच्या अभिनय कौशल्याची आजही तितकीच चर्चा आहे. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल...
> १८ मे १९७४ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या सोनालीने तिच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात कन्नड चित्रपट ‘चेलुवी’पासून केली गोती. त्यावेळी ती फक्त १८ वर्षांची होती. गिरीश कर्नाड यांच्या या चित्रपटासाठी सोनालीने सुरुवातीला नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी शिक्षणाचा हवाला दिला होता. मात्र, गिरीश यांनी समजावून सांगितल्यानंतर सोनालीने होकार दिला. यानंतर ती ‘मुक्ता’ या मराठी चित्रपटात दिसली होती.
> सोनालीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल बोलायचे झाले, तर तिने अमोल पालेकर यांच्या 'दायरा' या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. सोनालीने आतापर्यंत हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनय करताना भाषेचा काही फरक पडत नाही, असे तिचे मत आहे.
> सोनालीने इटालियन चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘फुओको सु दी मी’ या इटालियन चित्रपटासाठी २००६मध्ये मिलान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिला पुरस्कारही मिळाला होता.
> सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने दोनदा लग्न केली आहेत. आधी थिएटर-फिल्म दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत लग्न बंधनात अडकली होती. पण, हे नाते फार काळ टिकले नाही. यानंतर सोनालीच्या आयुष्यात नचिकेत पंतवैद्य आले आणि २०१०मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.
> सोनालीला लिहिण्याची आणि वाचनाचीही खूप आवड आहे. ‘दॅट्स सो कूल’ या शीर्षकाने ती साप्ताहिक कॉलम लिहायची. पुढे त्याच नावाने एक पुस्तकही प्रकाशित झाले.
> सोनालीही एकदा वादात सापडली होती. तिने आपल्या एका वक्तव्यात महिलांना आळशी म्हटले होते. ती म्हणाली होती की आजकाल बहुतेक मुली आळशी झाल्या आहेत. त्यांना सेटल झालेला जोडीदार हवा आहे, पण स्वत: काम करायचं नाही, असं म्हटलं होतं. या विधानावरून वाद इतका वाढला की, तिला माफी मागावी लागली होती.