Happy Birthday Simi Garewal : सध्या सिमी ग्रेवाल हे नाव सगळ्यांच्याच ओठांवर आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची एक्स गर्लफ्रेंड असणाऱ्या सिमी ग्रेवाल यांनी पोस्ट लिहून आपलं दुःख व्यक्त केलं होतं. यामुळे त्या पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. आज अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांचा वाढदिवस आहे. अभिनेत्रीने वयाच्या ७६व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सिमी ग्रेवाल यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी लुधियाना येथे झाला. ७०-८०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते.
सिमी ग्रेवाल यांना लहानपणापासूनच अभिनयाच्या जगतात प्रवेश करायचा होता. पण, त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. यामुळे सिमीला बहिणीसोबत इंग्लंडला अभ्यासासाठी पाठवण्यात आले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिमी पुन्हा भारतात आल्या आणि आपल्या अभिनयाच्या आवडीकडे वळल्या. त्यांचा पहिला चित्रपट १९६२ साली प्रदर्शित झाला होता. ‘टार्झन गोज टू इंडिया’ नावाचा हा एक इंग्रजी चित्रपट होता. या चित्रपटात सिमी ग्रेवाल यांच्यासोबत फिरोज खान यांनी मुख्य भूमिका केली होती.
यानंतर सिमीला 'सन ऑफ इंडिया' चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांच्या छोट्या भूमिकेने प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव टाकला. सिमी यांना खरी ओळख १९६५मध्ये रिलीज झालेल्या 'तीन देवीयां' या चित्रपटातून मिळाली. सिमी त्या काळातील बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये सामील होत्या. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील त्यांच्या एका सीनने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. ‘सिद्धार्थ’ या चित्रपटातही त्यांनी तिने न्यूड सीन दिला होता. बोल्ड सीन्समुळे सिमी ग्रेवाल अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाल्या होत्या. अभिनयासोबतच सिमीने दिग्दर्शनाच्या जगातही प्रवेश केला. त्यांनी मिथुन चक्रवर्ती आणि अनुराधा पटेल स्टारर ‘रुखसत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
एकेकाळी सिमी यांचे नवाब मन्सूर अली खान पतौडीसोबत अफेअर होते. पण काही कारणास्तव हे नाते पुढे जाऊ शकले नाही. मन्सूरसोबत नातं तुटल्यानंतर सिमी यांनी दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती रवी मोहन यांच्याशी लग्न केले. पण, हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान, त्यांचे नाव रतन टाटा यांच्यासोबत देखील जोडले गेले होते.
सिमीने चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शोचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय त्यांनी राज कपूर आणि राजीव गांधी यांच्यावर डॉक्युमेंट्रीही बनवल्या. ‘दो बदन और साथी’ या चित्रपटासाठी सिमी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याशिवाय, त्यांनी एक चॅट शो देखील चालवला, ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या गेल्या.
संबंधित बातम्या