Siddharth Jadhav Birthday : मराठी आणि हिंदीच नव्हे; तर बंगाली इंडस्ट्रीतही झळकलाय सिद्धार्थ जाधव! वाचा अभिनेत्याविषयी...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Siddharth Jadhav Birthday : मराठी आणि हिंदीच नव्हे; तर बंगाली इंडस्ट्रीतही झळकलाय सिद्धार्थ जाधव! वाचा अभिनेत्याविषयी...

Siddharth Jadhav Birthday : मराठी आणि हिंदीच नव्हे; तर बंगाली इंडस्ट्रीतही झळकलाय सिद्धार्थ जाधव! वाचा अभिनेत्याविषयी...

Oct 23, 2024 09:20 AM IST

Happy BirthdaySiddharth Jadhav: मराठी चित्रपट, टीव्ही आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपली प्रतिभा दाखवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचे नशीब बदलण्याचे श्रेय एका दिग्दर्शकाला जाते.

Happy Birthday Siddharth Jadhav
Happy Birthday Siddharth Jadhav

Happy Birthday Siddharth Jadhav : असं म्हणतात की, जर एखाद्याच्या नशिबी चमकायचं लिहिलं असेल, तर तो व्यक्ती कुठेही असला, तरी एक दिवस तो आकाशातल्या ताऱ्यासारखा नक्कीच चमकण्यास सुरुवात करतो. अभिनेता आणि कॉमेडियन सिद्धार्थ जाधवच्या बाबतीतही असंच काहीस झालं. आज (२३ ऑक्टोबर) सिद्धार्थ जाधव त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मराठी चित्रपट, टीव्ही आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपली प्रतिभा दाखवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचे नशीब बदलण्याचे श्रेय एका दिग्दर्शकाला जाते. सिद्धार्थने आपल्या अभिनयाची अशी झलक दाखवली की, त्याची कारकीर्द चमकू लागली. चला जाणून घेऊया कोण होता तो व्यक्ती...

२३ ऑक्टोबर १९८१ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे जन्मलेल्या सिद्धार्थ जाधवने शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावायला सुरुवात केली. अभिनयाची आवड त्याला लहानपणापासूनच होती. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून सुरुवात केली होती. करिअरच्या सुरुवातीला त्याने विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून आपली छाप सोडली. मराठी चित्रपटसृष्टीत आपले कौशल्य सिद्ध केल्यानंतर सिद्धार्थ जाधव टीव्हीकडे वळला आणि पहिल्याच शोपासून तो छोट्या पडद्यावर चमकू लागला. हा शो २००६मध्ये प्रसारित झालेला 'बा बहू और बेबी' होता. या शोद्वारे लोकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याला 'साराभाई वर्सेस साराभाई'मध्ये देखील काम मिळाले, ज्यामधून तो प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरला.

मराठी चित्रपटाचा कान्समध्ये बोलबाला! सिद्धार्थ जाधवच्या ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’नं जिंकलं साऱ्याचं मन

‘या’ दिग्दर्शकामुळे मिळाली आयुष्याला कलाटणी!

या दोन्ही शोमधून नाव कमावण्यासोबतच, २००६मध्ये सिद्धार्थ जाधवची अशा एका व्यक्तीची भेट झाली, ज्याने त्याच्या आयुष्याला नवीन उंचीवर नेले. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून, बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेला रोहित शेट्टी होता. रोहित शेट्टीने त्याच्या 'गोलमाल' या कॉमेडी चित्रपटात सिद्धार्थ जाधवला ब्रेक दिला, जो त्याच्यासाठी कलाकार म्हणून ब्रेकथ्रू ठरला. 'गोलमाल'मधील सिद्धार्थ जाधवची व्यक्तिरेखा लोकांना आवडली. याचाच परिणाम असा झाला की, २०१८मध्ये 'सिम्बा' चित्रपटात त्याची आणि रोहित शेट्टीची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 

हिंदी-मराठीसोबत बंगालीमध्येही झळकला!

रोहित शेट्टीसोबत दोन चित्रपटांमध्ये दमदार काम केल्यानंतर सिद्धार्थ जाधवलाही सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. भाईजानच्या 'राधे' चित्रपटात सिद्धार्थ दिसला होता. या चित्रपटात त्याने रणजीतची भूमिका साकारली होती. मराठी-हिंदी चित्रपट, टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवणाऱ्या सिद्धार्थ जाधवने बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. सिद्धार्थने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तीसोबत 'अली सुभाष बोलची' या चित्रपटातही काम केले आहे. यासोबतच सिद्धार्थ अनेक रिॲलिटी शोमध्येही दिसला आहे.

Whats_app_banner