Sanjay Mishra Birthday: प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेत्यानं केलंय ढाब्यावर काम! किस्सा ऐकून येईल डोळ्यांत पाणी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Mishra Birthday: प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेत्यानं केलंय ढाब्यावर काम! किस्सा ऐकून येईल डोळ्यांत पाणी

Sanjay Mishra Birthday: प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेत्यानं केलंय ढाब्यावर काम! किस्सा ऐकून येईल डोळ्यांत पाणी

Published Oct 06, 2024 08:50 AM IST

Sanjay Mishra birthday special: एक वेळ अशी आली जेव्हा संजय यांनी त्यांच्या करिअरला अलविदा करत आणि उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली होती.

Sanjay Mishra Birthday
Sanjay Mishra Birthday

Happy Birthday Sanjay Mishra : आपल्या दमदार विनोदी अभिनयाने सगळ्या रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या अभिनेता संजय मिश्रा यांचा आज (६ ऑक्टोबर) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म बिहारमधील दरभंगा येथे झाला. संजय यांनी आपल्या कारकिर्दीत अशा अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्यांच्या अप्रतिम कॉमिक टायमिंगने नेहमीच सगळ्यांना खूप हसवलं. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा संजय यांनी त्यांच्या करिअरला अलविदा करत आणि उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली. संजय मिश्रा हे त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होते. वडिलांचे निधन झाल्यावर त्यांना इतका मोठा धक्का बसला की, त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीदरम्यान संजय यांनी सांगितले होते की, त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा ते पूर्णपणे खचले होते. त्यानंतर त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि ढाब्यावर स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. या सगळ्यामागे त्यांच्या वडिलांचे निधन हे कारण होते. स्वत: संजय मिश्रा यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटत होते. वडिलांच्या जाण्याने संजय यांना खूप मोठा धक्का बसला होता. यानंतर त्यांनी अभिनयाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि ऋषिकेश येथील ढाब्यावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली.

Vinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही गाठली! वाचा विनोद खन्नांची कहाणी

मोठ्या पडद्यावर कसे परतले?

ढाब्यावर काम करत असताना संजय मिश्रा पुन्हा मोठ्या पडद्यावर परतले कसे? असा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. या मागे सगळ्यात मोठा आहे तो दिग्दर्शक रोहित शेट्टीचा... तो नसता तर कदाचित आज कॉमेडीचे बादशाह संजय मिश्रा अभिनयाच्या जगतापासून दूर गेले असते. रोहित शेट्टी आणि संजय मिश्रा यांनी ‘गोलमाल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर रोहित त्याच्या ‘ऑल द बेस्ट’ चित्रपटावर काम करत होता. या चित्रपटातील एका भूमिकेसाठी रोहितला संजय मिश्राच हवे होते. म्हणून रोहितने संजय मिश्रा यांना शोधून काढले आणि त्यांनी चित्रपटात काम करावे म्हणून खूप मनधरणीही केली.

'या’ चित्रपटातून केले पुनरागमन

अखेर संजय मिश्रा यांनी ‘ऑल द बेस्ट’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुरागमन केलं. यानंतर संजय मिश्रा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर येत संजय मिश्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत यश मिळवण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आपल्या कॉमिक स्टाईलने सगळ्यांना हसवणाऱ्या संजय यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय केला आणि पुन्हा आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले.

Whats_app_banner