Sana Saeed Birthday: शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन लेकीविषयी ‘हे’ माहितीये का? वाचा सना सईदबद्दल...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sana Saeed Birthday: शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन लेकीविषयी ‘हे’ माहितीये का? वाचा सना सईदबद्दल...

Sana Saeed Birthday: शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन लेकीविषयी ‘हे’ माहितीये का? वाचा सना सईदबद्दल...

Sep 22, 2023 08:11 AM IST

Happy Birthday Sana Saeed: सना सईदने शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Sana Saeed
Sana Saeed

Happy Birthday Sana Saeed: 'कुछ कुछ होता है' या आयकॉनिक बॉलिवूड चित्रपटात शाहरुख खानच्या लेकीची ‘अंजली’ची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सना सईदचा आज (२२ सप्टेंबर) वाढदिवस आहे. अभिनेत्री सना सईद हिचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ रोजी मुंबईत झाला होता. सना शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकली होती. सनाचा हा चित्रपट १९९८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. सनाने ९०च्या दशकांत या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटातून तिने आपल्या क्युटनेसने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती.

सना चित्रपट विश्वात गाजली असली, तरी तिच्या या कामाला कुटुंबाकडून प्रचंड विरोध झाला. अखेर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सनाने मनोरंजन विश्वात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री सना सईदच्या वडिलांना आपल्या मुलीने बॉलिवूडमध्ये करिअर करावे, असे अजिबात वाटत नव्हते. सनाने जेव्हा ' स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये बिकिनी घातली होती, तेव्हा तिचे वडील भडकले होते. मात्र, सना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत बिनधास्त पुढे जात राहिली.

Ravi Jadhav Birthday: जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या रवी जाधव यांनी का घेतला होता चित्रपट करण्याचा निर्णय?

'कुछ कुछ होता है' या चित्रपटानंतर सना सईदने 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल'मध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले होते. या तीन चित्रपटांनंतर मात्र तिने चित्रपट जगतातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. ब्रेक घेऊन तिने आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने टीव्ही मालिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत परतण्याचा निर्णय घेतला. २००८मध्ये सना सईद 'बाबुल का आंगन छोटे ना' आणि 'लो हो गई पूजा इस घर की' या टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. याशिवाय ती रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा ६', 'झलक दिखला जा ७', 'नच बलिए ७' आणि 'झलक दिखला जा ९' मध्ये देखील दिसली होती.

२०१२मध्ये, सना सईद पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली. करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. या चित्रपटात सना सईदने तिच्या हॉट स्टाईलने सगळ्यांचीच मने जिंकली होती. सना सईद सध्या अभिनयविश्वापासून दूर आहे. सना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Whats_app_banner