Sakshi Tanwar Birthday: साध्याभोळ्या पार्वतीने किसिंग सीन देऊन उडवली होती खळबळ! साक्षी तन्वरचा किस्सा माहितीय?-happy birthday sakshi tanwar the naive parvati created a sensation by giving a kissing scene in tv serial ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sakshi Tanwar Birthday: साध्याभोळ्या पार्वतीने किसिंग सीन देऊन उडवली होती खळबळ! साक्षी तन्वरचा किस्सा माहितीय?

Sakshi Tanwar Birthday: साध्याभोळ्या पार्वतीने किसिंग सीन देऊन उडवली होती खळबळ! साक्षी तन्वरचा किस्सा माहितीय?

Jan 12, 2024 09:03 AM IST

Happy Birthday Sakshi Tanwar: एकीकडे आदर्श सूनेच्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या साक्षी तन्वरने 'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही मालिकेमध्ये राम कपूरसोबत इंटिमेट सीन्स दिले होते.

Sakshi Tanwar Birthday
Sakshi Tanwar Birthday

Happy Birthday Sakshi Tanwar: छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय ‘सूनबाई’ म्हणून अभिनेत्री साक्षी तन्वर हीचं नाव घेतलं जातं. आजघडीला साक्षी तन्वरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अगदी तिचं नाव घेताच तिच्या कामाची वाहवा सुरू होते. ‘कहानी घर घर की’ या मालिकेत साक्षी तन्वरने साकारलेली ‘पार्वती बहु’ ही व्यक्तिरेखा इतकी गाजली की, आजही लोकांच्या लक्षात राहिली आहे. साधीभोळी पार्वती सगळ्यांचीच लाडकी बनली होती. मात्र, या मालिकेनंतर साक्षीने ‘प्रिया’ बनून छोट्या पडद्यावर जे इंटीमेट अन् किसिंग सीन दिले, त्यामुळे सगळीकडेच चांगली खळबळ माजली होती.

टेलिव्हिजनवर ‘आदर्श सून’ म्हणून आपले स्थान निर्माण करणाऱ्या साक्षीने केवळ टीव्ही मालिकांमध्येच नाही, तर अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, आता ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिलीये तिने राम कपूरसोबत दिलेल्या किसिंग सीनमुळे... या सीनमुळे साक्षी तन्वर रातोरात प्रसिद्ध झाली. मात्र, नंतर असा सीन केल्याचा पश्चात्ताप झाल्याचे देखील तिने म्हटले होते. साक्षी तन्वरचा जन्म १२ जानेवारी १९७३ रोजी राजस्थानमधील अलवर येथे झाला. तिने राजस्थानमधूनच शालेय शिक्षण पूर्ण केले, पण पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत आली. घरी कोणतीही फिल्मी बॅकग्राउंड नसताना देखील तिने मनोरंजन विश्वात येण्याचं स्वप्न पाहिलं.

Arun Govil Birthday: ‘रामा’च्या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते अरुण गोविल! मग कशी मिळवली भूमिका? वाचा...

कॉलेजमध्ये शिकत असताना साक्षीने एक जाहिरात पाहिली आणि ती दूरदर्शनच्या ‘अलबेला सूर मेला’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी गेली. पहिल्याच फेरीत तिची निवड झाली आणि तिथूनच तिचा हा मनोरंजन विश्वातील प्रवास सुरू झाला. फिल्मी गाण्यांवर आधारित दूरदर्शनचा ‘अलबेला सूर मेला’ हा कार्यक्रम १९९६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर साक्षीने 'दस्तूर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘कहानी घर घर की’ या मालिकेतील आदर्श सून ‘पार्वती’ने साक्षी तन्वरला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.

एकीकडे आदर्श सूनेच्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या साक्षी तन्वरने 'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही मालिकेमध्ये राम कपूरसोबत इंटिमेट सीन्स दिले. या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यात सुमारे १७ मिनिटांचा किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता. या सीनने छोट्या पडद्यावर खळबळ उडवून दिली होती. मात्र, या सीनमुळे दोघेही जोरदार ट्रोल झाले होते. राम कपूर आणि साक्षी तन्वरवर चित्रित झालेला हा किसिंग सीन टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लांब किसिंग सीन होता.

विभाग