Saif Ali Khan Birthday: ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘आदिपुरुष’; सैफ अली खानने साकारलेल्या ‘या’ भूमिका नेहमीच राहतील लक्षात!-happy birthday saif ali khan sacred games to adipurush the roles played by saif ali khan will always be remembered ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Saif Ali Khan Birthday: ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘आदिपुरुष’; सैफ अली खानने साकारलेल्या ‘या’ भूमिका नेहमीच राहतील लक्षात!

Saif Ali Khan Birthday: ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘आदिपुरुष’; सैफ अली खानने साकारलेल्या ‘या’ भूमिका नेहमीच राहतील लक्षात!

Aug 16, 2024 09:14 AM IST

Saif Ali Khan Famous Characters: सैफच्या अभिनय कारकिर्दीत असे अनेक वेळा झाले, जेव्हा त्याने त्याच्या पात्र निवडीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

Saif Ali Khan Famous Characters
Saif Ali Khan Famous Characters

Saif Ali Khan Birthday Special: सैफ अली खान अशा बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत साकारलेल्या भूमिकांवर आणि पात्रांवर खूप प्रयोग केले. इतकंच काय, तर आताही हे प्रयोग करताना दिसत आहे. असे प्रयोग करताना आणि वेगवेगळ्या भूमिका साकारताना त्याने केलेल्या गोष्टी या अजिबात सोप्या नाहीत. कारण, एकदा निर्माण झालेली प्रतिमा यामुळे मोडण्याची भीती असते. मात्र, सैफच्या अभिनय कारकिर्दीत असे अनेक वेळा झाले, जेव्हा त्याने त्याच्या पात्र निवडीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नसतील, परंतु सैफ अली खानच्या अभिनयाची सर्वांनी प्रशंसा केली. सैफच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या काही गाजलेल्या पात्रांबद्दल...

आदिपुरुष

सैफच्या प्रयोगशीलतेचे ताजे उदाहरण म्हणजे ‘आदिपुरुष’ चित्रपटातील त्याचे लंकेश हे पात्र. १६ जून २०२३ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात अभिनेता प्रभास 'राघव'च्या भूमिकेत, अभिनेत्री क्रिती सेनन 'माता जानकी'च्या भूमिकेत आणि सैफ अली खान 'लंकेश'च्या भूमिकेत दिसला होता. ‘आदिपुरुष’ची कथा रामायणावर आधारित होती. या चित्रपटात ‘लंकेश’ या व्यक्तिरेखेवर सर्वाधिक प्रयोग करण्यात आले आहेत. सैफने रामायणातील रावण वेगळ्या शैलीत सादर करण्याचा प्रयत्न केला.

तानाजी

'तानाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये सैफने उदयभान सिंह राठौरची भूमिका साकारली होती, जी नकारात्मक भूमिका होती. या चित्रपटात उदयभान सिंह मराठ्यांशी लढताना दिसला होता. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट सर्वांनाच आवडला होता. सैफ व्यतिरिक्त अजय देवगण, काजोल आणि शरद केळकर यांसारख्या इतर कलाकारांचाही या चित्रपटात समावेश होता. २०२०मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! ‘देवरा’मधील सैफ अली खानचा ‘भैरा’ पाहिलात का?

बाजार

या चित्रपटात शकुन कोठारीच्या भूमिकेत सैफ अली खान खूपच गाजला होता. ‘बाजार’ या चित्रपटात त्याने ग्रे शेडची भूमिका साकारली होती, जी बाजारातील व्यापाऱ्याची भूमिका होती. शकुन स्वतःला शेअर बाजाराचा राजा समजतो. या चित्रपटात सैफसोबत राधिका आपटे,  रोहन मेहरा, चित्रांगदा सिंह या कलाकारांनी काम केले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

ओंकारा

‘ओंकारा’मधील ‘लंगडा त्यागी’ची भूमिका सैफच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली. रोमँटिक आणि ॲक्शन चित्रपट करत असलेला सैफ पहिल्यांदाच त्याच्या ऑनस्क्रीन कूल इमेजच्या उलट देशी स्टाईलमध्ये दिसला. लंगडा त्यागीच्या भूमिकेसाठी त्याला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनयाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओंकारा’ हा चित्रपट शेक्सपियरच्या ओथेलो या नाटकापासून प्रेरित होता.

सेक्रेड गेम्स

२०१८ साली रिलीज झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजने चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली होती. या सीरिजमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. ज्यावेळी बॉलिवूडचे बहुतेक कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्म टाळत होते, त्या वेळी अभिनेत्याने ‘सेक्रेड गेम्स’सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. सैफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सेक्रेड गेम्स’मधील शानदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली. सैफ आणि नवाजशिवाय या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, राधिका आपटे, नीरज काबी यांसारखे कलाकारही दिसले होते.

दिल चाहता है

'दिल चाहता है' या चित्रपटात सैफने समीर नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती आणि हा चित्रपट त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अक्षय खन्ना आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसले होते.

विभाग