Happy Birthday S. S. Rajamouli : साऊथ असो किंवा बॉलिवूड एस. एस. राजमौली हे नाव उच्चारलं की एका मोठा धमाका होतो. त्यांचे सगळेच चित्रपट ब्लॉक बस्टर हिट होतात. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’सह ‘आरआरआर’सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या दिग्दर्शकाने मनोरंजन विश्वालाच भुरळ घातली आहे. आज (१० ऑक्टोबर) राजमौली यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी...
प्रभास, रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यासारख्या बड्या कलाकारांनंतर आता साऊथ सुपरस्टार महेश बाबू याला घेऊन एस.एस. राजमौली नवा चित्रपट बनवणार आहेत. आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सध्या देशातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांच्या यादीत एसएस राजामौली यांचे नाव आघाडीवर आहे. आपल्या दोन दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट केलेला नाही. ‘आरआरआर’पासूनच चाहते त्यांच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अभिनेता महेश बाबू त्यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाला अद्याप नाव देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाला ‘एसएसएमबी २९’ म्हटले जात आहे. केवळ साऊथच नाही तर, हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकही या चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. महेश बाबूचे चाहते गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाबाबत मोठ्या अपडेटची वाट पाहत आहेत. ‘एसएसएमबी २९’चे शूटिंग जानेवारी २०२५मध्ये सुरू होणार आहे.
एसएस राजामौली यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनवरील ‘शांती निवासम’ या मालिकेचे दिग्दर्शक म्हणून केली होती आणि ही मालिका राघवेंद्र राव यांनी तयार केली होती. त्यानंतर २००१मध्ये राघवेंद्रने राजामौली यांना त्यांच्या प्रोडक्शन बॅनरखाली ‘स्टुडंट नंबर १’चे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरला कास्ट करण्यात आले होते आणि हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
राजामौली यांचा पहिला चित्रपट ‘स्टुडंट नंबर १’ होता, ज्यात त्यांनी ज्युनियर एनटीआरला कास्ट केले होते. हा चित्रपट २००१मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर राजामौली यांनी एकामागोमाग हिट चित्रपट दिले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२ चित्रपट दिग्दर्शित केले असून, ते सर्व हिट ठरले आहेत. त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये ‘मगधीरा’, ‘बाहुबली’, ‘बाहुबली २’ अशा धमाकेदार चित्रपटांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या