मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘बाफ्टा’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी! वाचा त्यांच्याबद्दल खास गोष्टी...

‘बाफ्टा’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी! वाचा त्यांच्याबद्दल खास गोष्टी...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 11, 2024 07:57 AM IST

रोहिणी हट्टंगडी या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत, हे कदाचित फार कमी लोकांना माहित असेल.

‘बाफ्टा’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी! वाचा त्यांच्याबद्दल खास गोष्टी...
‘बाफ्टा’ पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी! वाचा त्यांच्याबद्दल खास गोष्टी...

आपल्या सशक्त अभिनयाने मराठीच नव्हे ते, इतरही भाषांमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रोहिणी हट्टंगडी यांना आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अनेकदा तुम्ही पुरुष कलाकारांना स्त्री पात्रे साकारताना पाहिलं असेल. पण, मोठ्या पडद्यावर पुरुषांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री फार कमी आहेत. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी त्या निवडक कलाकारांपैकी एक आहे. ११ एप्रिल १९५५ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या सत्तरीच्या या टप्प्यावरही त्यांनी अद्याप कामातून निवृत्ती घेतलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

कदाचित हे फार कमी लोकांना माहित असेल की, रोहिणी हट्टंगडी या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी ७४ वर्षांच्या कस्तुरबा गांधींची भूमिका साकारून रोहिणी हट्टंगडी यांनी अभिनयाच्या दुनियेत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. मराठी आणि हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त रोहिणी हट्टंगडी यांनी इतर अनेक भाषांमध्ये चित्रपट केले. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

नवऱ्याच्या आयुष्यात आलेली दुसरी मुलगी पाहून सायली रुसणार! ‘ठरलं तर मग’मध्ये प्रेमाचा त्रिकोण दिसणार?

बाफ्टा मिळवणाऱ्या पहिल्या अभिनेत्री!

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा 'अग्निपथ' हा सुपरहिट चित्रपट टीव्हीवर पाहत जवळपास आपण सगळेच मोठे झाले आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक झाले होते. या पात्रासाठी रोहिणी हट्टंगडी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय, एका राष्ट्रीय पुरस्कारासह आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह त्यांनी इतर अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी रोहिणी हट्टंगडी यांना बाफ्टा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

लक्षात राहिलेल्या व्यक्तिरेखा

रोहिणी हट्टंगडी या बाफ्टा अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या आहेत. संजय दत्तच्या मुन्ना 'भाई एमबीबीएस' या चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली व्यक्तिरेखा कोणी कशी विसरू शकेल... या चित्रपटात त्यांनी संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. याशिवाय 'घातक' आणि 'चालबाज' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्या ओळखल्या जातात. रोहिणी हट्टंगडी यांचे लग्न तिचे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे बॅचमेट जयदेव यांच्याशी झाले होते. २००८मध्ये जयदीप यांचे कर्करोगाने निधन झाले. रोहिणी यांना असीम हट्टंगडी नावाचा एक मुलगा आहे, जो देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.

IPL_Entry_Point