मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riya Sen Birthday: पार्टीत मुलीला किस ते न्यूड एमएमएस लीक; ‘या’ वादांमुळे चर्चेत राहिली रिया सेन!

Riya Sen Birthday: पार्टीत मुलीला किस ते न्यूड एमएमएस लीक; ‘या’ वादांमुळे चर्चेत राहिली रिया सेन!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 24, 2024 07:45 AM IST

Happy Birthday Riya Sen: रियाची फिल्मी कारकीर्द फारशी चांगली नव्हती. सततच्या वादांमुळे तिची छोटी कारकीर्द पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

Happy Birthday Riya Sen
Happy Birthday Riya Sen

Happy Birthday Riya Sen:बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हिने काही वर्षांपूर्वीच मनोरंजन विश्वाला अलविदा केला होता. ती अखेर २०१७मध्ये'लोनली गर्ल'या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. आज (२४ जानेवारी) अभिनेत्री रिया सेन हिचा वाढदिवस असून, ती ४४ वर्षांची झाली आहे. अभिनेत्री रिया सेन हिचा जन्म २४ जानेवारी १९८१ रोजी कोलकातामध्ये झाला. रिया एका राजघराण्याशी संबंधित आहे. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. तर, रिया सेनची आई मुनमुन सेन आणि आजी सुचित्रा सेन या दोघीही उत्तम अभिनेत्री होत्या. मात्र, रियाची फिल्मी कारकीर्द फारशी चांगली नव्हती. सततच्या वादांमुळे तिची छोटी कारकीर्द पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

रिया सेनने वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. १९९१मध्ये'विषकन्या'चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिची आई मुनमुन सेन मुख्य अभिनेत्री होती. रियाने'स्टाइल', 'झंकार बीट्स',मल्याळम हॉरर फिल्म'अनंतभद्रम', 'नौका डूबी'यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र,या चित्रपटांमधून रियाला इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळवता आली नाही. हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली,इंग्रजी,तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. रिया सेनला बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ देखील म्हटले जाते. अभिनेत्री तिच्या चित्रपटांसाठी कमी, पण वादांसाठी जास्त चर्चेत होती.

Tharala Tar Mag: माथेरानच्या गुलाबी हवेत साजरा होणार सायली-अर्जुनचा रोमँटिक हनिमून! व्हिडीओ पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेता अश्मित पटेलसोबत रिया सेनच्या अफेअरच्या अनेक किस्से ऐकायला मिळतात. दोघांचा एक न्यूड एमएमएसही लीक झाला होता. या घटनेनंतर रिया सेनचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याशिवाय'रागिनी एमएमएस रिटर्न्स'च्या सेटवर तिच्या सहकलाकाराने अभिनेत्रीवर कपडे काढल्याचा आरोप केला होता. रियाचा को-स्टार निशांत मलकानी यांनी आरोप केला होता की,जेव्हा दोघे एक इंटिमेट सीन शूट करत होते, तेव्हा अभिनेत्रीने परवानगीशिवाय कॅमेरासमोर त्याची पॅंट काढली होती. याशिवाय २०१६मध्ये रिया सेनने पार्टीदरम्यान एका मुलीला किस केल्यामुळे ती चर्चेत आली होती.

यानंतर चित्रपट सोडून तिनेही वेब सीरिजकडे आपला मोर्चा वळवला.'जहर', 'मिसमॅच २', 'पति,पत्नी और वो'सारख्या वेब सीरिजमध्ये ती झळकली आहे. रिया सेनने ऑगस्ट २०१७मध्ये प्रियकर शिवम तिवारीसोबत एका खाजगी समारंभात लग्न केले. रिया सेन इंडस्ट्रीत कमी आणि सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर स्वतःचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करून अभिनेत्री चर्चेत असते.

WhatsApp channel

विभाग