अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब! शाळेतही घेऊन जायची बॉडीगार्ड्स
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब! शाळेतही घेऊन जायची बॉडीगार्ड्स

अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब! शाळेतही घेऊन जायची बॉडीगार्ड्स

Jun 03, 2024 08:13 AM IST

आपल्या पहिल्याच चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या रिंकू राजगुरूचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब!
अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब!

वयाच्या अवघ्या अवघ्या १५-१६व्या वर्षी शाळकरी मुले जेव्हा वह्या, पुस्तकं, अभ्यास आणि शाळा यात गुंतलेली असतात, तेव्हा रिंकू राजगुरू या मुलीने आपल्या यशाची कहाणी लिहिली होती. ‘सैराट गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिंकू राजगुरूने महाराष्ट्रात आणि देशात नव्हे, तर अवघ्या जगात आपलं नाव गाजवलं. ३ जून २००१ रोजी महाराष्ट्रातील अकलूज गावात जन्मलेल्या रिंकूला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनमध्ये मिळाला पहिला चित्रपट!

आपल्या पहिल्याच चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या रिंकू राजगुरूचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. खरंतर तिला तिचा पहिला चित्रपट मिळण्यामागे देखील एक भन्नाट किस्सा होता. ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे काही कामानिमित्त अकलूज गावात गेले होते. रिंकूला ते आपल्या गावात आल्याची माहिती मिळताच, ती तिच्या मैत्रिणींसोबत त्त्याना भेटायला गेली. तेव्हा नागराज मंजुळे यांची नजर रिंकूवर पडली आणि त्यांना लगेच त्यांच्या आगामी चित्रपटाची अभिनेत्री सापडली. त्यांनी रिंकू राजगुरू हिला चित्रपटाची ऑफर देऊ केली आणि अवघ्या १० मिनिटांची ऑडिशन घेतली. इतकंच नाही तर, काही दिवसांनी रिंकूची चित्रपटासाठी निवड देखील झाली.

हुबेहूब शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रेयसीसारखी दिसते सोनाक्षी सिन्हा! रीना रॉयची मुलगी म्हणताच अभिनेत्री म्हणाली...

जेव्हा शाळेतून काढून टाकल्याची अफवा पसरली!

‘सैराट’ या मराठी चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिंकूला शाळेतून काढून टाकण्यात आल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. ही घटना त्यावेळची आहे, जेव्हा रिंकू दहावीत शिकत होती. ‘सैराट’मुळे तुफान प्रसिद्धी मिळाल्याने रिंकू शाळेत जाऊ शकली नाही आणि कमी उपस्थितीमुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. मात्र, नंतर शाळा व्यवस्थापनाने याला नकार दिला होता.

Raveena Tandon News: मद्यधुंद रवीना टंडनने वयोवृद्ध महिलेसोबत केली हाणामारी; अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल!

जेव्हा हॅकर्सनी रिंकूला त्रास दिला

‘सैराट’साठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर लोक तिला ओळखू लागले. त्यादरम्यान हॅकर्सनी तिचे फेसबुक पेज हॅक करून त्यावर महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मोबाईल क्रमांक अपलोड केला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर रिंकूच्या फेसबुक पेजवरून मंत्र्यांचा नंबर काढून टाकण्यात आला होता. ‘सैराट’ रिलीज झाल्यानंतर रिंकूच्या नावाने अनेक फेसबुक पेजेस तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते.

बॉडीगार्ड घेऊन जायची शाळेत!

‘सैराट’मधून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर रिंकूचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटात येण्यापूर्वी ती आईसोबत बिनधास्त बाजारात जायची, जी चित्रपटानंतर बंद झाली. ‘सैराट’मधून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे शाळेत जाताना देखील तिला सोबत बॉडीगार्ड्स घेऊन जावे लागत होते. रिंकूने २०१७मध्ये १०वी आणि २०१९मध्ये १२वीची परीक्षा दिली होती.

Whats_app_banner