अभिनय नव्हे तर राणी मुखर्जीला ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! ‘अशी’ झाली कारकिर्दीची सुरुवात-happy birthday rani mukerji do you know these things about bollywood actress ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनय नव्हे तर राणी मुखर्जीला ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! ‘अशी’ झाली कारकिर्दीची सुरुवात

अभिनय नव्हे तर राणी मुखर्जीला ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! ‘अशी’ झाली कारकिर्दीची सुरुवात

Mar 21, 2024 07:51 AM IST

राणी मुखर्जीची मनोरंजन विश्वातील एन्ट्री तशी सोपी नव्हती. एक काळ असा होता की, राणीच्या आवाजाला कर्कश म्हणत तिचे सगळे संवाद डब केले जायचे.

अभिनय नव्हे तर राणी मुखर्जीला ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम!
अभिनय नव्हे तर राणी मुखर्जीला ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! (ANI Picture Service)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आज वयाच्या ४६व्या वर्षात पदार्पण करत आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबईत झाला. राणीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील राणी मुखर्जीचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र, याआधी राणी तिच्या वडिलांचा बंगाली चित्रपट ‘बियार फूल’मध्ये झळकली होती.

राणी मुखर्जीची मनोरंजन विश्वातील एन्ट्री तशी सोपी नव्हती. एक काळ असा होता की, राणीच्या आवाजाला कर्कश म्हणत तिचे सगळे संवाद डब केले जायचे. तिच्या आवाजावरून वाद निर्माण झाला होता. अगदी आमिर खाननेही तिच्या भारी आवाजामुळे राणी मुखर्जीची खिल्ली उडवली होती. पण, राणीचं अभिनय कौशल्य या सगळ्यावरच भारी पडलं. पण, राणीला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. राणीला अभिनेत्री नव्हे तर, फॅशन डिझायनर व्हायचे होते. पण तिच्या वडिलांमुळे तिला चित्रपट विश्वात पदार्पण करावे लागले.

moosewala family news : नवजात बाळाच्या जन्मावर पंजाब सरकारने उपस्थित केला प्रश्न! सिद्धू मुसेवालाचे वडील संतापले

राणी मुखर्जीचा अंदाजच बदलला!

‘राजा की आयेगी बारात’, ‘राणी गुलाम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हॅलो ब्रदर’, ‘मन’, ‘बिच्चू’, ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटांमध्ये राणी मुखर्जी झळकली. २००२मध्ये रिलीज झालेल्या 'साथिया' आणि २००३मध्ये रिलीज झालेल्या 'चलते चलते' या चित्रपटांमध्ये राणी एकदम वेगळ्या अंदाजात दिसली होती. राणीचा हा धमाकेदार अंदाज पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. या चित्रपटानंतर लोक तिला बॉलिवूडची 'क्वीन' म्हणू लागले. पण, मग पुन्हा एकदा एक वेळ अशी आली की, राणी काही काळ मोठ्या पडद्यावरून गायब झाली.

Rakhi Sawant in Trouble: राखी सावंत आणि समीर वानखेडे यांच्यात जुंपली! नेमकं काय झालं?

लग्नानंतर घेतला ब्रेक

राणीने तिच्या चित्रपट प्रवासात अनेक चढउतार पाहिले. राणी मुखर्जीने २०१४मध्ये यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केले. खूप दिवसांपासून त्यांच्या अफेअरची चर्चा होती. पण, ते दोघेही कधीच उघडपणे यावर बोलले नाहीत. अनेक वर्षे डेट केल्यानंतर राणी आणि आदित्यने कुटुंबियांच्या साक्षीने इटलीमध्ये लग्न केले. आजपर्यंत दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत. या जोडप्याला आदिरा नावाची एक मुलगी आहे. लग्नानंतर आणि मुलीच्या जन्मानंतर राणी मुखर्जी काही काळ चित्रपटांपासून दूर राहिली होती. पण, पती आदित्य चोप्राच्या सांगण्यावरून ती पुन्हा चित्रपटांकडे वळली. 'मर्दानी' आणि 'ब्लॅक' सारख्या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी राणी मुखर्जीला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग