Randeep Hooda Birthday: एकेकाळी पोट भरण्यासाठी टॅक्सी चालवली; आता जगतोय ऐशोआरामाचं आयुष्य! वाचा रणदीप हुड्डाबद्दल…-happy birthday randeep hooda once drove a taxi for daily needs now living a life of luxury read about actor ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Randeep Hooda Birthday: एकेकाळी पोट भरण्यासाठी टॅक्सी चालवली; आता जगतोय ऐशोआरामाचं आयुष्य! वाचा रणदीप हुड्डाबद्दल…

Randeep Hooda Birthday: एकेकाळी पोट भरण्यासाठी टॅक्सी चालवली; आता जगतोय ऐशोआरामाचं आयुष्य! वाचा रणदीप हुड्डाबद्दल…

Aug 20, 2024 07:43 AM IST

Randeep Hooda luxurious life: रणदीपच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याला आपला खर्च भागवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरचं काम करावं लागलं.

Randeep Hooda luxurious life
Randeep Hooda luxurious life

Happy Birthday Randeep Hooda: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता रणदीप हुड्डा आज आपला ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. रणदीप हुड्डा याने 'साहिब बीबी और गँगस्टर', 'सरबजीत', 'हायवे', 'सुलतान' यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण, फार कमी लोकांना माहित असेल की, रणदीप हुड्डाच्या कुटुंबाची इच्छा होती की, त्याने डॉक्टर व्हावे. पण, नशिबाने त्याला अभिनेता बनवले. इतकंच नाही, तर रणदीपच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याला आपला खर्च भागवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरचं काम करावं लागलं. मात्र, एवढे करूनही त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आजघडीला तो एक हुशार कलाकार असण्यासोबतच ते अतिशय आलिशान जीवन जगत आहे. देशातील दोन शहरांमध्ये त्याची आलिशान घरे आहेत. यासोबतच त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. रणदीपचा जन्म २० ऑगस्ट १९७६ रोजी हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला. त्याचे वडील व्यवसायाने सर्जन असून, आई सामाजिक कार्यकर्ती आहे. रणदीप ८ वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोनीपतच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. तिथूनच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चांगल्या अभ्यासासाठी दिल्लीतील डीपीएसमध्ये प्रवेश घेतला. पण, रणदीपला डॉक्टर व्हायचे नव्हते, म्हणून तो पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आणि तिथून मार्केटिंगमध्ये पदवी घेतली.

ऑस्ट्रेलियात चालवली टॅक्सी!

रणदीप हुड्डासाठी ऑस्ट्रेलियात राहणे सोपे नव्हते. त्यामुळे आपला खर्च भागवण्यासाठी त्याने एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले. एवढेच नाही, तर या काळात रणदीप हुड्डा याने लोकांच्या गाड्या धुतल्या आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केले. शिक्षण पूर्ण करून तो २०००मध्ये भारतात परतला. इथे आल्यानंतर त्याने एका विमान कंपनीत मार्केटिंग विभागात काम केले. या कामासोबतच त्याने मॉडेलिंग आणि थिएटरमध्येही काम केले. त्यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली.

Randeep Hooda's Wife: कोण आहे रणदीप हुड्डाची होणारी पत्नी लिन लेशराम

कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

रणदीप हुड्डाची चित्रपटांमध्ये एन्ट्री खूपच मनोरंजक होती. २००१मध्ये जेव्हा तो नसीरुद्दीन शाह यांच्या 'द प्ले टू टीच हिज ओन' या नाटकाच्या रिहर्सलमध्ये चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांना भेटला, तेव्हा मीरा नायर यांनी त्याची व्यक्तिरेखा पाहून ऑडिशनचा सल्ला दिला होता. त्यानंतर 'मान्सून वेडिंग' या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाची निवड झाली. रणदीप हुड्डा यांच्या ऑस्ट्रेलियन उच्चारामुळे त्याला या चित्रपटात एनआरआयची भूमिका देण्यात आली. 'मान्सून वेडिंग'नंतर रणदीपने अंडरवर्ल्ड चित्रपट 'डी' द्वारे बरीच चर्चा केली. हा चित्रपट रणदीपच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. दाऊदच्या व्यक्तिरेखेवर आधारित या चित्रपटाने रणदीपला स्टार बनवले.

आलिशान आयुष्य जगतोय रणदीप!

रणदीप हुड्डा मुंबईत एका आलिशान घरात राहतो, ज्याची रचना बॉलिवूडच्या लोकप्रिय डिझायनर्सनी केली आहे. याशिवाय हरियाणातील रोहतक येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, जिथे तो वारंवार जात असतो. देशातील दोन शहरांमध्ये आलिशान घरांशिवाय रणदीपकडे अनेक आलिशान कारही आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज बेंझ जीएलएसची किंमत ९५ लाख रुपये ते बीएमडब्ल्यू ५ सीरिजची कार ६२लाख रुपयांची आहे. याशिवाय त्याच्याकडे ७१.३९ लाख रुपयांची रेंज रोव्हर आणि ६५.३६ लाख रुपयांची व्होल्वो व्ही९० कार आहे. याशिवाय त्याच्याकडे एक घोडाही आहे.

विभाग