Randeep Hooda Birthday: गाड्या धुण्यापासून ते हॉटेलमध्ये काम करण्यापर्यंत रणदीप हुडाने केला ‘इतका’ संघर्ष!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Randeep Hooda Birthday: गाड्या धुण्यापासून ते हॉटेलमध्ये काम करण्यापर्यंत रणदीप हुडाने केला ‘इतका’ संघर्ष!

Randeep Hooda Birthday: गाड्या धुण्यापासून ते हॉटेलमध्ये काम करण्यापर्यंत रणदीप हुडाने केला ‘इतका’ संघर्ष!

Published Aug 20, 2023 07:25 AM IST

Happy Birthday Randeep Hooda:अभिनेता रणदीप हुडा गेल्या २० वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. २००१मध्ये आलेला ‘मान्सून वेडिंग’ हा त्याचा पहिला चित्रपट होता.

Randeep Hooda
Randeep Hooda

Happy Birthday Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुडा सध्या त्याच्या आगामी स्वातंत्र्यवीर सावरकर या बायोपिकमुळे चर्चेत आहे. आज (२० ऑगस्ट) अभिनेता रणदीप हुडा त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. रणदीप हुडा याने अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने स्वतःला सिद्ध केले आहे. मनोरंजन विश्वात स्थिरस्थावर होण्याआधी त्याने अनेक मेहनतीची कामे केली होती. तब्बल ३२ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रणदीप हुडा याने कधीकाळी हॉटेलमध्ये वेटर ते गाडी धुण्यापर्यंतची सगळीच कामे केली होती.

अभिनेता रणदीप हुडा गेल्या २० वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. २००१मध्ये आलेला ‘मान्सून वेडिंग’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने एक एनआरआयची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या रणदीपचा हा प्रवास खूपच रंजक आहे.हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रणदीपचा जन्म झाला. रणदीपचे वडील व्यवसायाने सर्जन असून, त्याची आई सामाजिक कार्यकर्ती आहे. रणदीप अवघ्या ८ वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोनीपतच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. इथेच त्याने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले.

Satvya Mulichi Satavi Mulgi: मनोरमा कोण? अवघ्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न! अद्वैत-नेत्रा अखेर शोधणार उत्तर

यानंतर रणदीप हुडा उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात गेला होता. मेलबर्नमध्ये त्याने मार्केटिंग आणि मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. ऑस्ट्रेलियात शिकत असताना रणदीपने चायनीज रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम केले. त्याने कार साफ केली आणि टॅक्सीही चालवली. मेहनत करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. २ वर्षानंतर तो भारतात परतला आणि एअरलाइन्सच्या मार्केटिंग विभागात नोकरीला लागला. २००१मध्ये मीरा नायरच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने एनआरआयची भूमिका साकारली होती. त्याच्या ऑस्ट्रेलियन उच्चारामुळे त्याला चित्रपटात ही भूमिका मिळाली होती. या चित्रपटाच्या ४ वर्षानंतर त्याला दुसरा प्रोजेक्ट मिळाला.

२००५मध्येअंडरवर्ल्डवर आलेल्या ‘डी’ या चित्रपटाने बरीच चर्चा निर्माण केली होती. या चित्रपटातूनच रणदीपला खरी ओळख मिळाली. हा चित्रपट रणदीपच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. दाऊदच्या व्यक्तिरेखेवर बनलेल्या या चित्रपटाने रणदीपला स्टार बनवले. त्यानंतर रणदीपने कधीही मागे वळून पाहिले नाही.

Whats_app_banner