मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rana Daggubati Birthday: मृत्यूशी झुंज दिली, एक डोळाही निकामी! राणा दग्गुबातीबद्दल 'हे' माहितीय का?

Rana Daggubati Birthday: मृत्यूशी झुंज दिली, एक डोळाही निकामी! राणा दग्गुबातीबद्दल 'हे' माहितीय का?

Dec 14, 2023 08:27 AM IST

Happy Birthday Rana Daggubati: अभिनेता राणा दग्गुबाती हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. केवळ अभिनेताच नाही, तर राणा दग्गुबाती एक चांगला फोटोग्राफर देखील आहे.

Happy Birthday Rana Daggubati
Happy Birthday Rana Daggubati

Happy Birthday Rana Daggubati: साऊथचा अभिनेता राणा दग्गुबाती त्याच्या 'बाहुबली' चित्रपटातील 'भल्लाल देव' या भूमिकेमुळे अधिक लोकप्रिय झाला. आज (१४ डिसेंबर) राणा दग्गुबाती त्याचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'बाहुबली' या चित्रपटात राणाने खलनायकाची भूमिका साकारली होती. पण, खऱ्या आयुष्यात राणा अगदी एका हिरोप्रमाणे शूर आहे. अभिनयाचं बाळकडू राणा दग्गुबाती याला त्याच्या कुटुंबातूनच मिळालं. फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातच राणा दग्गुबाती याचा जन्म झाला. त्यामुळे मनोरंजन विश्वात स्थिरस्थावर होण्यासाठी त्याला फार संघर्ष करावा लागला नाही. मात्र, त्याच्या आरोग्याने अभिनेत्याला अक्षरशः मृत्युदेवतेचं दर्शन घडवलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता राणा दग्गुबाती हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. केवळ अभिनेताच नाही, तर राणा दग्गुबाती एक चांगला फोटोग्राफर देखील आहे. कोनिक इन्स्टिट्यूट ऑफ इमेजिंग अँड टेक्नॉलॉजीमधून त्याने फोटोग्राफीचा कोर्स देखील केला होता. राणा दग्गुबाती याने चेन्नईमध्ये अनेक माहितीपट आणि जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. राणाने २०१० मध्ये आलेल्या 'लीडर' या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. 'बाहुबली' या चित्रपटासाठी राणाने स्वत:ला पूर्णपणे बदलून टाकले होते. आपले वजन १०० किलोपर्यंत वाढवण्यासाठी त्याने दररोज ४० अंडी खाल्ली होती. तर, अनेक तास जीममध्ये वर्कआऊट करत होता.

Raj Kapoor Birth Anniversary: स्टुडिओमध्ये झाडू मारली, एक रुपया पगार घेतला! 'अशी' होती राज कपूर यांची सुरुवात...

राणासाठी या सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या. त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान हे होते की, तो एका डोळ्याने काहीच बघू शकत नाही. राणा दग्गुबाती याचा एक डोळा पूर्णपणे निकामी आहे. लहानपणी त्याला एका डोनरने डोळा दान केला होता. मात्र, तो डोळा लावूनसुद्धा राणाची दृष्टी परत आली नाही. त्यामुळे तो आयुष्यभरासाठी एक डोळ्याने आंधळा झाला. जर, डावा डोळा बंद केला तर राणाला काहीच दिसत नाही, हे त्याने स्वतः सांगितले होते. एका चॅट शोमध्ये बोलताना राणाने आपल्या तब्येतीबद्दल खुलासा केला होता.

यावेळी राणा म्हणाला होता की, त्याच्या हृदयात कॅल्सीफिकेशन झाल्यामुळे समस्या वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या किडनीमध्येही समस्या निर्माण झाल्या होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्याला ७० टक्के स्ट्रोकचा धोका होता. अशा परिस्थितीत त्याच्या मृत्यूची शक्यताही ३० टक्के होती. मात्र, या सगळ्यात राणाने हिंमत हरली नाही. या समस्यांशी तो लढला आणि मृत्यूला देखील परतवून लावले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग