Rajpal Yadav Birthday: उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajpal Yadav Birthday: उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री?

Rajpal Yadav Birthday: उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री?

Mar 16, 2024 08:04 AM IST

Happy Birthday Rajpal Yadav: राजपाल यादव यांचे बालपण अतिशय खडतर होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अगदीच बिकट होती.

उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री?
उदरनिर्वाहासाठी लोकांचे कपडे शिवायचे राजपाल यादव! कशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री?

Happy Birthday Rajpal Yadav: बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार विनोदी अभिनयाने अवघ्या प्रेक्षक वर्गाला पोट धरून हसायला लावणाऱ्या अभिनेता राजपाल यादव यांचा आज (१६ मार्च) वाढदिवस आहे. अभिनेते राजपाल यादव यांचा जन्म १६ मार्च १९७१ रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर नावाच्या एका छोट्या गावात झाला होता. राजपाल यादव यांचे बालपण अतिशय खडतर होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अगदीच बिकट होती. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी हालाखीची होती की, त्यांच्याकडे स्वतःचे घर देखील नव्हते. दोन वेळेच्या अन्नासाठी त्यांचे कुटुंब खूप काबाडकष्ट करायचे.

या परिस्थितीतही आपल्या मुलाने म्हणजेच राजपाल यादवने शिक्षण पूर्ण करावे, अशी वडिलांची इच्छा होती. पण, राजपाल यादव यांना ‘कॉमेडी’ बघायची आणि करायची आवड होती. कधी संधी मिळाली की, ते गावोगावी जाऊन नाटक, पथनाट्य बघायचे आणि स्वतः सहभागी देखील व्हायचे. मात्र, एक वेळ अशी आली की, कुटुंबाची परिस्थिती पाहून राजपाल यादव यांनी वडिलांसोबत कपडे शिवण्यास सुरुवात केली. लोकांचे कपडे शिवून ते कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवू लागले. पण, राजपाल यादव यांची अभिनयाची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. अखेर त्यांनी अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

Amitabh Bachchan : अँजियोप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर

चित्रपटांपूर्वी टीव्ही मालिकांमध्ये केले काम!

राजपाल यादव यांनी लखनौमधील भारतेंदू नाट्य अकादमी आणि दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून नाट्य आणि अभिनयाचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी स्वप्ननगरी मुंबई गाठली. सुरुवातीला राजपाल यादव यांनी चित्रपटांमध्ये भूमिकांची शोधाशोध केली. पण, काम मिळत नसल्याने ते टीव्ही मालिकांकडे वळले. त्यांनी मालिकांमधून काम करायला सुरुवात केली. 'स्वराज' ही राजपाल यादव यांना मिळालेली पहिली मालिका होती. या मालिकेतील त्यांचा अभिनय आणि अप्रतिम विनोदबुद्धी लोकांना प्रचंड आवडली. पुढे राजपाल यादव यांनी 'नया दौर', 'मोहनदास' आणि 'मुंगेरीलाल के हसीन सपने'सारख्या मालिकांमध्ये देखील काम केले.

चित्रपटांतील कॉमेडीचे 'बादशाह'!

मालिकांमध्ये काम करूनही राजपाल यादव यांना विशेष ओळख मिळवता आली नाही. यानंतर १९९९मध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांनी राजपाल यादवला त्यांच्या 'दिल क्या करे' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर ब्रेक दिला. ‘दिल क्या करे’ हा राजपाल यादव यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री काजोल आणि महिमा चौधरीसोबत काम केले. यानंतर राजपाल यादव 'मस्त' आणि 'शूल' या चित्रपटात झळकले. मात्र, 'जंगल' हा चित्रपट राजपाल यादव यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. राजपाल यादव यांना चित्रपटात खलनायक व्हायचे होते. पण, उत्कृष्ट कॉमिक टायमिंगमुळे ते ‘कॉमेडी किंग’ बनले. राजपाल यादव यांनी 'प्यार तूने क्या किया', 'चांदनी बार', 'कंपनी', 'हासील','चुप चुपके' आणि 'भूल भुलैया' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.

Whats_app_banner