Prajakta Mali Birthday: अभिनयात अजिबातच रस नव्हता! मग कशी मनोरंजन विश्वात आली प्राजक्ता माळी? वाचा...-happy birthday prajakta mali how did prajakta mali enter the entertainment world ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali Birthday: अभिनयात अजिबातच रस नव्हता! मग कशी मनोरंजन विश्वात आली प्राजक्ता माळी? वाचा...

Prajakta Mali Birthday: अभिनयात अजिबातच रस नव्हता! मग कशी मनोरंजन विश्वात आली प्राजक्ता माळी? वाचा...

Aug 08, 2024 08:31 AM IST

Happy Birthday Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वात एक चमकदार नाव असलेली प्राजक्ता माळी, आजच्या घडीला एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण, ही यशस्वी कारकीर्द तिने स्वप्नातही बघितली नव्हती.

अभिनयात अजिबातच रस नव्हता! मग कशी मनोरंजन विश्वात आली प्राजक्ता माळी? वाचा...
अभिनयात अजिबातच रस नव्हता! मग कशी मनोरंजन विश्वात आली प्राजक्ता माळी? वाचा...

Happy Birthday Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वात प्राजक्ता माळी हे नाव ऐकताच एक प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्रीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. नृत्याच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करूनही ती अपघाताने अभिनय क्षेत्रात आली आणि आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अवघ्या महाराष्ट्राची लाडकी प्राजू म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आज (८ ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. याच ख निमित्ताने जाणून घेऊया, तिच्या आयुष्यातील काही भन्नाट गोष्टी…

मराठी मनोरंजन विश्वात एक चमकदार नाव असलेली प्राजक्ता माळी, आजच्या घडीला एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण, ही यशस्वी कारकीर्द तिने स्वप्नातही बघितली नव्हती. एका अप्रत्याशित वळणाने ती नृत्याच्या जगातून अभिनयाच्या जगात उतरली. मूळची पुणेकर असलेल्या प्राजक्ताला नृत्य खूप आवडत होते. ललित कला केंद्रात नृत्य विषयात एमए करत असताना एका योगायोगाने तिची भेट ‘तांदळा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांशी झाली. त्यांनी तिला या चित्रपटात एक छोटीशी भूमिका दिली. यानंतर प्राजक्ताला मागे वळून पाहण्याची गरजच उरली नाही. एकामागून एक संधी मिळत गेल्या आणि प्राजक्ताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

Dada Kondke Birthday: ते हसवायचे, ते रडवायचे आणि खोट्याचा पर्दाफार्श देखील करायचे! ‘असे’ होते दादा कोंडके!

घरच्या परिस्थितीमुळे केलं काम!

घरची परिस्थिती बेताची असल्याने प्राजक्ताने सुरुवातीला निवेदन आणि काही भूमिका केवळ पैशाची गरज भागवण्यासाठी केल्या. प्राजक्ताला टीव्हीवर दिसायचं होतं आणि त्यासाठी ती कोणतेही काम करायला तयार होती. मात्र, ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेनंतर प्राजक्ताला या क्षेत्राचे गांभीर्य जाणवलं. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे तिने पूर्णपणे अभिनय क्षेत्रातच काम करण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ताने वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांसोबतच ‘रानबाजार’सारख्या वेब सीरिजमध्ये केलेली भूमिका सुद्धा खूप गाजली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं निवेदन करत आहे.

प्राजक्ताची कहाणी प्रेरणादायी!

प्राजक्ता फक्त अभिनय क्षेत्रातच मर्यादित नाही, तर ती निर्मिती क्षेत्रातही काही नवे प्रयोग करू पाहत आहे. यासोबतच ती आता व्यवसाय विश्वात देखील आपली जागा निर्माण करत आहे. तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे. तर, ती एक कवियत्री देखील बनली आहे. तिचा एक काव्य संग्रह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्राजक्ताची कहाणी ही त्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यांचे स्वप्न वेगळे असूनही त्यांना अपघाताने वेगळी संधी मिळते. प्राजक्ताने आपल्या कठोर परिश्रमाने आणि प्रतिभेने अभिनय क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.