Poonam Pandey Birthday: केवळ मृत्यूची अफवाच नाही, तर पूनम पांडेने आधीही केलेत विचित्र पब्लिसिटी स्टंट!-happy birthday poonam pandey know about poonam pandey and her controversial career ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Poonam Pandey Birthday: केवळ मृत्यूची अफवाच नाही, तर पूनम पांडेने आधीही केलेत विचित्र पब्लिसिटी स्टंट!

Poonam Pandey Birthday: केवळ मृत्यूची अफवाच नाही, तर पूनम पांडेने आधीही केलेत विचित्र पब्लिसिटी स्टंट!

Mar 11, 2024 09:13 AM IST

Happy Birthday Poonam Pandey: नेहमीच वादग्रस्त गोष्टी करणारी पूनम पांडे तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे देखील प्रसिद्धी झोतात असते. पूनम पांडे आणि वाद हे समीकरण तसं नवीन नाही.

Happy Birthday Poonam Pandey
Happy Birthday Poonam Pandey

Happy Birthday Poonam Pandey: बॉलिवूडची काँट्रोव्हर्सी क्वीन म्हणजेच अभिनेत्री पूनम पांडे हिचा आज (११ मार्च) वाढदिवस आहे. पूनम पांडे नेहमीच काहीना काही कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. नेहमीच वादग्रस्त गोष्टी करणारी पूनम पांडे तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे देखील प्रसिद्धी झोतात असते. पूनम पांडे आणि वाद हे समीकरण तसं नवीन नाही. नुकतीच स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळे पूनम पांडे हिला चांगलंच ट्रोल केलं गेलं होतं. मात्र, हा काही तिचा पहिला पब्लिसिटी स्टंट नव्हता. या आधीही अनेकदा तिने असेच काही विचित्र पब्लिसिटी स्टंट केले आहेत.

विश्वचषकादरम्यानचे वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री पूनम पांडे २०११मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी वादात सापडली होती. २०११मध्ये तिने भारत वर्ल्डकप जिंकला, तर ती भर मैदानात स्वतःचे सगळे कपडे उतरवेल, अशी खळबळजनक घोषणा केली होती. तिच्या या वक्तव्यावर या बराच गदारोळ मजला होता. पूनम पांडे हिच्या घरी देखील चांगलाच गोंधळ उडाला होता. या वक्तव्यामुळे तिला अनेकांची बोलणी ऐकावी लागली होती.

पूनम पांडेचा बाथरुम व्हिडीओ लीक

पूनम पांडे तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे खूप प्रसिद्धी झोतात आली होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा बाथरुम व्हिडीओ लीक झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अर्थात हा बोल्ड व्हिडीओ पूनम पांडे हिने स्वतःच लीक केल्याचे म्हटले जाते. या व्हायरल क्लिपमध्ये पूनम पांडे अंघोळ करताना डान्स करत असल्याचे दिसत होते. मात्र, नंतर हा व्हिडीओ यूट्यूबने ब्लॉक केला होता.

Viral Video: ऑस्कर २०२४च्या मंचावर जॉन सीनाने घेतली ‘न्यूड’ एन्ट्री; व्हायरल व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

कोरोना काळात झालेली अटक

पूनम पांडेला कोरोना काळात सेफ्टी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असताना पूनम पांडेने असे कृत्य केले की, वादात सापडली होती. कोव्हिड-१९ सेफ्टी प्रोटोकॉलमुळे कोणालाही रस्त्यावर फिरण्याची परवानगी नव्हती, त्या काळात पूनमने पती सॅमसोबत एका बीचवर फिरत बोल्ड फोटोशूट केले होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

पाटीवर केला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

अभिनेत्री पूनम पांडे हिने सप्टेंबर २०२०मध्ये सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. परंतु, लग्नाच्या काही दिवसांतच तिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. ही जोडी हनिमूनसाठी गोव्यात असतनाच, पूनम पांडे हिने सॅमविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. हनिमून दरम्यान सॅमने तिचा त्याच्यावर विनयभंग करून, तिला धमक्या दिल्या आणि मारहाणही केली, असा आरोप तिने केला होता.

वादग्रस्त 'पांडे ॲप' लॉन्च

सतत काही ना काही विचित्र गोष्टी करणाऱ्या पूनम पांडे हिने २०१७मध्ये 'पांडे ॲप' हे स्वतःचे ॲप्लिकेशन लॉन्च केले होते. मॉडेल आणि अभिनेत्री असणारी पूनम पांडे या ॲपवर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत होती. मात्र, गुगलने हे ॲप अवघ्या काही तासांतच प्ले स्टोअरवरून हटवले होते.