Pooja Sawant Birthday: कशी झाली होती पूजा सावंतची अभिनय क्षेत्रात एंट्री? वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pooja Sawant Birthday: कशी झाली होती पूजा सावंतची अभिनय क्षेत्रात एंट्री? वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी...

Pooja Sawant Birthday: कशी झाली होती पूजा सावंतची अभिनय क्षेत्रात एंट्री? वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी...

Jan 25, 2024 07:43 AM IST

Happy Birthday Pooja Sawant: आपल्या सहज सुंदर अभिनयाने पूजा सावंत हिने नेहमीच सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मात्र, या मनोरंजन विश्वात पूजा सावंतची एंट्री नेमकी कशी झाली, ते तुम्हाला माहिती आहे का?

Happy Birthday Pooja Sawant
Happy Birthday Pooja Sawant

Happy Birthday Pooja Sawant: मराठी मनोरंजन विश्वाची ‘कलरफूल’ अभिनेत्री अशी ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचा आज वाढदिवस आहे. सध्या पूजा सावंत तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. पूजाने स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यामुळे आता सगळेच चाहते पूजाच्या लग्नाची वाट बघत आहत. आपल्या सहज सुंदर अभिनयाने पूजा सावंत हिने नेहमीच सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मात्र, या मनोरंजन विश्वात पूजा सावंतची एंट्री नेमकी कशी झाली, ते तुम्हाला माहिती आहे का?

२५ जानेवारी १९९० रोजी पूजा सावंत हिचा जन्म झाला. पूजा सावंत हिचे वडील विलास सावंत हे देखील अतिशय उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांनी अनेक नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. यामुळेच अभिनय हा पूजाच्या रक्तातच होता. वडिलांमुळेच पूजा सावंत हिला देखील अभिनय क्षेत्राची गोडी लागली होती. याशिवाय पूजा सावंत हिला नृत्याची देखील प्रचंड आवड आहे. एरव्ही चित्रपटांच्या गाण्यांमध्ये सुंदर नृत्य अदा दाखवणारी अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात देखील चांगली डान्सर आहे. शाळेत असताना पूजा सावंत प्रत्येक नृत्य स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायची. तिने तिच्या डान्ससाठी अनेक बक्षीसं देखील पटकावली आहेत.

Happy Republic Day 2024: बॉलिवूडच्या ’या’ देशभक्तीपर गाण्यांशिवाय अधुरे आहे प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन!

केवळ शालेय जीवनातच नाही तर, तिने टीव्हीच्या एका डान्स शोमध्ये देखील भाग घेतला होता. एकीकडे नृत्याची आवड जपणाऱ्या पूजा सावंत हिने ‘श्रावण क्वीन’ स्पर्धेतही भाग घेण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेतून मनोरंजन विश्वाची कवाडं आपल्यासाठी खुली होती, अशी आशा तिला होती. या स्पर्धेसाठी तिने स्वतःला झोकून देऊन मेहनत घेतली. २००८मधल्या या स्पर्धेत अनेक तरुणींना मागे टाकून पूजा सावंत विजेती बनली. या स्पर्धेचं परीक्षण करायला आलेला अभिनेता-निर्माता सचित पाटील त्यावेळी ‘क्षणभर विश्रांती’ नावाचा चित्रपट करत होता. या चित्रपटासाठी त्याने पूजा सावंत हिला विचारणा केली. तर, पूजाने ही लगेच होकार दिला.

‘क्षणभर विश्रांती’ या पहिल्याच चित्रपटातून पूजा सावंत प्रेक्षकांची लाडकी बनली. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका सगळ्यांनाच आवडली होती. या चित्रपटानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘सांगतो ऐका’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘पोस्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, “दगडी चाळ २’ असा दमदार चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Whats_app_banner