Parineeti Chopra Birthday: कधीकाळी बँकेत काम करणारी परिणीती चोप्रा कशी बनली अभिनेत्री? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Parineeti Chopra Birthday: कधीकाळी बँकेत काम करणारी परिणीती चोप्रा कशी बनली अभिनेत्री? वाचा...

Parineeti Chopra Birthday: कधीकाळी बँकेत काम करणारी परिणीती चोप्रा कशी बनली अभिनेत्री? वाचा...

Published Oct 22, 2023 07:37 AM IST

Happy Birthday Parineeti Chopra: परिणीतीचा हा वाढदिवस खूप खास असणार आहे. कारण, तिच्या लग्नानंतरचा हा पहिला वाढदिवस आहे.

Parineeti Chopra
Parineeti Chopra

Happy Birthday Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुंदर आणि चर्चित अभिनेत्रींच्या यादीत परिणीतीचा समावेश होतो. नुकतेच अभिनेत्री परिणीती चोप्राने आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न केले. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. आज (२२ ऑक्टोबर) परिणीती तिचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. परिणीतीचा हा वाढदिवस खूप खास असणार आहे. कारण, तिच्या लग्नानंतरचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील उत्सुक आहेत. लग्नानंतरचा वाढदिवस ती कशी सेलिब्रेट करते हे पाहणे सगळ्यांसाठीच उत्सुकतेचे ठरणार आहे. परिणितीने अभिनय क्षेत्रात नाव कमावले असले, तरी आधी ती एका बँकेत काम करत होती.

२२ ऑक्टोबर १९८८ रोजी अंबाला येथे जन्मलेल्या परिणीती चोप्रा प्राथमिक शिक्षण पूर्ण करून वयाच्या १७व्या वर्षी लंडनला गेली. परिणीती चोप्राला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. तिने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये तिहेरी पदवी प्राप्त केली. त्यानंतर परिणीतीने भारतात परत येण्यापूर्वी काही वर्षे लंडनमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणूनही काम केले. पण, २००९मध्ये आलेल्या मंदीमुळे ती भारतात परत आली.

Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्रींनीं ट्रॅक बदलला; खऱ्या कथा नव्हे, आता 'या' विषयावर चित्रपट बनवणार!

लंडनहून भारतात परत आल्यानंतर, परिणीती चोप्राने यशराज फिल्म्समध्ये जनसंपर्क सल्लागार अर्थात पीआर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे काम केल्यानंतर तिने २०११मध्ये पहिल्यांदा अभिनयात नशीब आजमावण्याचा ठरवले. तिने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परिणीतीचा हा पहिलाच चित्रपट तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील परिणीतीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. याच चित्रपटापासून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत नसून, सहाय्यक भूमिकेत दिसली होती. मात्र, या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ती 'इशकजादे' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली.

'शुद्ध देसी रोमान्स', 'हसी तो फसी', 'मेरी प्यारी बिंदू', 'गोलमाल अगेन', 'नमस्ते इंग्लंड', 'किल-दिल', 'केसरी', 'मिशन राणीगंज' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला गाण्याचीही आवड असून, तिच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने गाण्यांना आवाज दिला आहे.

Whats_app_banner