Happy Birthday Neil Nitin Mukesh : बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश याचा आज (१५ जानेवारी) वाढदिवस आहे. दिसायला अगदी ब्रिटीश लोकांसारखा असल्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील तो नेहमीच चर्चेत राहिला. नीलचे खरे नाव नील नितीन मुकेश चंद माथूर आहे. नीलच्या लूकमुळे त्याला बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिका अधिक मिळाल्या. मात्र, आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. अभिनेता असणाऱ्या नीलचा संगीत विश्वाशी देखील खास संबंध आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
अभिनेता नील नितीन मुकेश याचा जन्म १५ जानेवारी १९८२ रोजी महाराष्ट्रात झाला. नील नितीन मुकेश या त्याच्या नावामागे देखील एक रंजक कथा आहे. नीलच्या घरी संगीत पार्श्वभूमी आहे. मात्र, नीलला संगीतासोबतच अभिनयाची देखील आवड निर्माण झाली होती. अभिनेत्याचे पूर्ण नाव नील नितीन मुकेश चंद माथूर असे आहे. नीलला हे नाव प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी दिले होते. लता मंगेश या त्यावेळी नील आर्मस्ट्राँगमुळे खूप प्रभावित झाल्या होत्या. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अभिनेत्याला पाहिले, तेव्हा त्या म्हणाल्या की, याचं नाव नील ठेवा. आणि तेव्हापासून त्याला नील हे नाव मिळाले. नील या आपल्या नावासोबतच आपल्या वडिलांचं आणि आजोबांचं नाव देखील लावतो.
अभिनेता नील नितीन मुकेश आता जरी मनोरंजन विश्वात सक्रिय नसला, तरी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. मोठ्या पडद्यावर बहुतांश खलनायकी भूमिका साकारून या त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोरा रंग, तपकिरी डोळे अगदी राजबिंडं रूप की, पाहणारा प्रत्येक व्यक्ती नीलच्या प्रेमातच पडेल. नीलला गाण्याचा वारसा आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता. मात्र, नीलने गाण्याऐवजी अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडले. नील त्याच्या चित्रपटांमुळेही अनेकदा चर्चेत राहिला होता.
नीलने त्याच्या ‘जेल’ या चित्रपटात न्यूड पोज दिल्याने तो वादातही अडकला होता. याशिवाय अभिनेत्याने याच चित्रपटात मुख्य अभिनेत्रीसोबत तब्बल ३० किसिंग सीन करून खळबळ उडवून दिली होती. 'जन्नत' फेम अभिनेत्री सोनाल चौहान ही ‘जेल’ या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होती. या दोघांवर अनेक लीपलॉक सीन चित्रित झाले होते, ज्यांनी बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजवली होती.