Happy Birthday Nagma : ९०च्या दशकात अनेक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींचा एक वावर सिनेमाच्या दुनियेत दिसला. त्यातच एक नाव होतं नगमा. अभिनेत्री नगमा, जी एक काळी सुपरस्टार्ससोबत रोमँटिक भूमिका साकारत होती, ती आज इंडस्ट्रीपासून दूर, गुमनामीचं आयुष्य जगत आहे. २५ डिसेंबर १९७४ रोजी मुंबईत जन्मलेल्या नगमाचा एक राजघराण्याशी संबंध आहे. नगमाचं खरं नाव नंदिता अरविंद मोरारजी. तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली, तेव्हा ती 'नगमा' या नावाने ओळखली जाऊ लागली.
नगमाचे वडील अरविंद मोरारजी यांचा वंश जैसलमेरच्या शाही कुटुंबाशी संबंधित होता. त्यांच्या कुटुंबाने पुढे पोरबंदरमध्ये स्थलांतर केले आणि अखेर त्यांच्या दादांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.नगमाने मुंबईतील नॅशनल कॉलेजमध्ये कॉमर्स विषयातून शिक्षण घेतले. कॉलेजच्या काळातच नगमाने अभिनयाच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. करिअरची सुरुवात तिने मॉडेलिंगपासून सुरू केली.
नगमाने १९९० मध्ये ‘बागी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत झळकला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप झाला. पण १९९४मध्ये आलेल्या ‘सुहाग’ या चित्रपटाने नगमाला यश मिळवून दिलं. या चित्रपटात तिच्या जोडीदाराच्या भूमिकेत अक्षय कुमार होता. या चित्रपटातील ‘गोरे-गोरे मुखड़े पे काला काला चश्मा’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर शाहरुख खानसोबत ‘किंग अंकल’सारख्या चित्रपटातही नगमा दिसली होती.
नगमाने तमिळ, तेलुगू आणि भोजपुरी सिनेमातही आपला ठसा उमटवला. रजनीकांत, चिरंजीवी आणि नागार्जुन यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत तिने काम केले. भोजपुरी सिनेमात तिने रवि किशन आणि मनोज तिवारी यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट होते. तिच्या लोकप्रियतेमुळे नगमा त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणली जात होती.
नगमाचे एक अफेअर भारतातील क्रिकेट जगतातील दिग्गज क्रिकेटर सौरव गांगुलीसोबत होते. दोघांची पहिली भेट १९९९ मध्ये वर्ल्ड कप दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघं अनेक वेळा एकत्र दिसले. नगमाने स्वत: या संबंधाची कबूल केली होती आणि सांगितलं होतं की, सौरव आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिला लग्नासाठी प्रस्ताव देऊ इच्छित होता, पण नगमा याला नकार दिला. दोघं एकमेकांपासून दूर झाले कारण सौरव क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता, असं नगमाने सांगितलं होतं.
आज नगमा ५० वर्षांची झाली आहे, पण तिचा आता चित्रपट विश्वाशी फारसा संबंध नाही. तिने २००४ मध्ये काँग्रेस पक्षासाठी प्रचार केला होता, यावरून तिची राजकारणातही रुची होती हे दिसून येते. आजही नगमा सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करते, पण ती फार सक्रिय नाही. इतकंच नाही तर, अभिनेत्री अद्यापही सिंगल आहे.