Mugdha Godse Birthday: कधीकाळी पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या मुग्धा गोडसेने ‘अशी’ मिळवली बॉलिवूडमध्ये जागा!-happy birthday mugdha godse know these things about actress mugdha godse ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mugdha Godse Birthday: कधीकाळी पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या मुग्धा गोडसेने ‘अशी’ मिळवली बॉलिवूडमध्ये जागा!

Mugdha Godse Birthday: कधीकाळी पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या मुग्धा गोडसेने ‘अशी’ मिळवली बॉलिवूडमध्ये जागा!

Jul 26, 2023 07:23 AM IST

Happy Birthday Mugdha Godse: मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुग्धा गोडसे हिने कधीकाळी पेट्रोल पंपावर काम करून दिवसाला १०० रुपये कमावले होते.

Mugdha Godse
Mugdha Godse

Happy Birthday Mugdha Godse : 'फॅशन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मुग्धा गोडसे आज (२६ जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुग्धा गोडसे हिने कधीकाळी पेट्रोल पंपावर काम करून दिवसाला १०० रुपये कमावले होते. स्वतःच्या गरजा आणि खर्च भागवण्यासाठी मुग्धाने अनेक नोकऱ्या केल्या. मुग्धा ही वाणिज्य पदवीधर आहे. लेक्चर बंक करणे, रोज नवे मित्र बनवणे, डिस्कोमध्ये मस्ती करणे, मैत्रिणींसोबत फिरणे आणि अभ्यासापासून दूर पळणे असे मुग्धाचे कॉलेज लाईफ मजेत चालले होते. एवढेच नाही तर, ती मित्रांसोबत कार आणि दुचाकीचे टायर पंक्चर करायची. मुग्धाचा आवडता विषय अर्थशास्त्र होता. या विषयाचा क्लास ती कधीच बंक करत नसे.

मुग्धाने मॉडेलिंगमधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. यादरम्यान मुग्धाला २००२मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट’ जिंकून पहिले यश मिळाले. या यशानंतर मुग्धा लाईमलाईटमध्ये आली. २००२मध्येच तिने मिस इंडियामध्ये सर्वोत्कृष्ट मॉडेल आणि सर्वोत्कृष्ट पोशाख हा किताब जिंकला. २००४मध्ये, मुग्धा फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. यानंतर ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत शिफ्ट झाली.

Hum Hain Rahi Pyar Ke: एका सीनसाठी दिवसभर आमिर खानला किस करत राहिली अभिनेत्री!

'खतरों के खिलाडी सीझन ५'मध्ये धोकादायक स्टंट करणारी मुग्धा एकदा शाहरुख खानसोबत एका जाहिरातीतही दिसली होती. मुग्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पाच वर्षे टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये काम केले. तिने शाहरुख खानसोबत एअरटेलच्या अॅडमध्ये काम केले होते. यासोबतच क्लोज-अप आणि अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली. यादरम्यान तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.

‘कोका तेरा कोका’, ‘लेकर हम दिवाना दिल’, ‘मौजा ले दे’, ‘चुप चुप खडे हो’ आणि ‘जब छाये मेरा जादू’ यासारख्या अनेक पंजाबी आणि रिमिक्स गाण्यांमध्येही तिने काम केले. मुग्धाने २००८मध्ये मधुर भांडारकरच्या 'फॅशन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 'ऑल द बेस्ट', 'जेल', 'हेल्प', 'हिरोईन', 'साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स' यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. या शिवाय मुग्धा गोडसे हिने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं.

विभाग