मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ना प्रसिद्धी होती ना पैसा; उदरनिर्वाहासाठी कधीकाळी बाथरूमही साफ केले! वाचा मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी...

ना प्रसिद्धी होती ना पैसा; उदरनिर्वाहासाठी कधीकाळी बाथरूमही साफ केले! वाचा मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी...

Jun 16, 2024 07:44 AM IST

मिथुन चक्रवर्ती यांच्या या प्रवासात संघर्ष कधीच चुकला नाही. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षयने एका मुलाखतीत वडिलांच्या संघर्षाबद्दल सांगितले होते.

ना प्रसिद्धी होती ना पैसा; उदरनिर्वाहासाठी कधीकाळी बाथरूमही साफ केले! वाचा मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी...
ना प्रसिद्धी होती ना पैसा; उदरनिर्वाहासाठी कधीकाळी बाथरूमही साफ केले! वाचा मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी...

आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या अनोख्या डान्स स्टेप्सनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे डिस्को डान्सर, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा आज (१६ जून) वाढदिवस आहे. आज अभिनेते मिथुन चक्रवर्ती आपला ७४वा वाढदिवस साजरा करत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, तामिळ, तेलुगू, भोजपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या दमदार कारकिर्दीव्यतिरिक्त, मिथुन चक्रवर्ती त्यांच्या प्रेमकहाणीमुळे देखील चर्चेत होते.

ट्रेंडिंग न्यूज

मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव कदाचित तुम्हाला माहितही नसेल. मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती असून, त्यांनी चित्रपट जगतात पहिले पाऊल ठेवताच आपले नाव बदलले. या नवीन नावाने ते इंडस्ट्रीत प्रसिद्ध होताच, लोकांनी त्यांना खूप आदर दिला. आजघडीला ते मिथुनदा या नावाने इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. मिथुन दा यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर निर्माता आणि गायक म्हणूनही हिंदी चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे. याशिवाय ते त्यांच्या डान्स मूव्हसाठीही ओळखले जातात.

ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर? पाहा मराठी मालिकांचा TRP Report

मिथुन चक्रवर्ती यांचा संघर्ष

मिथुन चक्रवर्ती यांच्या या प्रवासात संघर्ष कधीच चुकला नाही. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षयने एका मुलाखतीत वडिलांच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. घर चालवण्यासाठी आपल्या वडिलांना एकेकाळी बाथरूम देखील स्वच्छ केले होते, असे त्याने म्हटले. खुद्द मिथुन चक्रवर्ती यांनीही त्यांच्या संघर्षाबद्दल अनेक वेळा सांगितले आहे. मिमोहने सांगितले की, मिथुन सुरुवातीच्या काळात एका व्यक्तीसोबत रूम शेअर करत असे. पण, एके दिवशी त्या व्यक्तीने मिथुन यांना खोली सोडण्यास सांगितले. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती अक्षरशः रस्त्यावर आले. आता काय खायचं, कुठे जायचं, कसं जायचं याची त्यांनी काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी उदरनिर्वाहासाठी त्यांनी अक्षरशः जिममधील बाथरूमही साफ केले होते.

योगिता बाली यांच्याशी लग्न

मिथुन चक्रवर्ती केवळ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासाठीच चर्चेत राहिले नाहीत, तर ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिले आहेत. मिथुन यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक होती. त्यांचे लग्न अवघे काही महिने टिकले. यानंतर योगिता बालीसोबतच्या त्यांच्या लव्हस्टोरीची बरीच चर्चा झाली. योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या आधी ज्येष्ठ अभिनेते किशोर कुमार यांच्याशी लग्न केले होते. योगिता ही किशोर कुमार यांची तिसरी पत्नी होती, या जोडप्याने १९७६मध्ये लग्न केले आणि १९७८मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर १९७९मध्ये मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचे लग्न झाले.

WhatsApp channel