मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mika Singh Birthday: ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ मिका सिंह! अभिनेत्रीला जबरदस्ती केलं किस, तर कधी खाल्लीय तुरुंगाची हवा

Mika Singh Birthday: ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ मिका सिंह! अभिनेत्रीला जबरदस्ती केलं किस, तर कधी खाल्लीय तुरुंगाची हवा

Jun 10, 2023 07:32 AM IST

Happy Birthday Mika Singh:मिका सिंह याला‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ म्हणूनही ओळखतात. त्याचे नाव अनेकदा वादामध्ये अडकले आहे. अशाच एका प्रकरणात तर त्याला तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती.

Mika Singh
Mika Singh

Happy Birthday Mika Singh:बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह त्याच्या दमदार गाण्यांमुळे चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र, मिका त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे अधिक चर्चेत राहिला आहे. बॉलिवूडचा हा लोकप्रिय गायक मिका सिंह आज (१० जून) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मिका सिंह याला‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ म्हणूनही ओळखतात. त्याचे नाव अनेकदा वादामध्ये अडकले आहे. अशाच एका प्रकरणात तर त्याला तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. चला तर जाणून घेऊया मिका सिंहबद्दलच्या अशाच काही वादांबद्द्ल...

राखी सावंतचं बळजबरी चुंबन

गायक मिका सिंहचा ‘किस स्कँडल’ तर आजही सगळ्यांच्या लक्षात राहिला आहे. स्वतःच्या बर्थडे पार्टीत मिका सिंह याने राखी सावंतचे जबरदस्तीने चुंबन घेतले होते. यानंतर राखीने चांगलाच गोंधळ घातला होता. इतकंच नाही तर, तिने मिका सिंहवर गुन्हाही दाखल केला होता.

हिट अँड रन केस

अभिनेता सलमान खानच नव्हे, गायक मिका सिंहही हिट अँड रन प्रकरणात अडकला होता. २०४१मध्ये मिकावर ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले होते की,मिकाने ऑटो रिक्षाला धडक दिली होती आणि त्यात रिक्षातील प्रवासी देखील जखमी झाले होते. मात्र,यावर स्पष्टीकरण देताना आपण गाडी चालवत नसल्याचे मिकाने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Ayesha Shroff: जॅकी श्रॉफची पत्नी आयशा यांनी पोलिसात केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

डॉक्टरांना मारहाण

मिका सिंह एका ‘थप्पड’ प्रकरणात देखील अडकला आहे. त्याचा असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात तो डॉक्टरांना मारहाण करताना दिसला होता. मिकाने एका कार्यक्रमात दक्षिण दिल्लीतील एका डॉक्टरला जोरदार थप्पड मारली होती. आपण नव्हे, तर डॉक्टरनेच आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे मिकाने म्हटले होते.

बिपाशाचा किस

मिका सिंहने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता,ज्यामध्ये त्याच्या गालावर लिपस्टिकच्या खुणा दिसल्या होत्या. या खुणा म्हणजे अभिनेत्री बिपाशा बसूचे चुंबन असल्याचे त्याने म्हटले होते. या प्रकरणामुळे तो खूप चर्चेत आला होता. मात्र, नंतर त्याने स्वतः खुलासा करत हा एक प्रँक असल्याचे म्हटले होते.

अश्लील मेसेज पाठवल्यामुळे तुरुंगवास

मिका सिंह याला एका प्रकरणात तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. ब्राझीलच्या तरुणीला अश्लील मेसेज पाठवल्या प्रकरणी मिका सिंहला शिक्षा झाली होती. १७वर्षीय परदेशी तरुणीने मिकावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर मिका सिंहला तुरुंगात जावे लागले होते.

WhatsApp channel