Happy Birthday Mallika Sherawat: बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत आज (२४ ऑक्टोबर) आपला ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. मनोरंजन विश्वापासून दार असली तरी मल्लिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री मल्लिका शेरावतचा जन्म २४ ऑक्टोबर १९७६ रोजी हिसार, हरियाणात झाला. मल्लिकाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
मल्लिका शेरावतचा जन्म रोहतकच्या जाट कुटुंबात झाला. मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा होते. हरियाणातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बाजवणारे सेठ छज्जू राम यांच्या कुटुंबात मल्लिकाचा जन्म झाला होता. मल्लिकाने आयएएस व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पण, मल्लिकाला मात्र सुरुवातीपासूनच चित्रपटात काम करायचे होते. तिच्या या निर्णयाला कुटुंबाने प्रचंड विरोध केला. अशावेळी मल्लिका आपल्या कुटुंबाशी असलेले सगळे नातेसंबंध तोडून मुंबईत आली. तिने कुटुंबासोबतच आपले जुने नाव देखील मागे सोडले. वडिलांऐवजी आईचं आडनाव वापरून तिने मल्लिका शेरावत हे नवीन नाव धारण केलं.
चित्रपटात येण्यापूर्वी मल्लिका एअर होस्टेस म्हणून काम करायची. २००२मध्ये 'जीना सिरफ मेरे लिए' या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली. २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुराग बसूच्या 'मर्डर' या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. 'मर्डर' या चित्रपटानंतर मल्लिकाची फी प्रचंड वाढली होती. या चित्रपटात तिने तब्ब्ल १७ किसिंग सीन दिले होते.
मल्लिका तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत होती. 'डर्टी पॉलिटिक्स'मधील एका इंटिमेट सीनवरून अभिनेत्रीचा ओम पुरीसोबत वाद झाला होता. मल्लिका ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती, जिला प्लेबॉय मासिकाच्या कव्हर पेजवर दिसण्याची संधी मिळाली होती. यासाठी तिला न्यूड शूट करावे लागणार होते. मात्र, तिने यासाठी थेट नकार दिला. मल्लिका शेरावत हिने हिंदीशिवाय इंग्रजी आणि चायनीज चित्रपटांमध्येही काम केले आहे. इतकेच नाही तर, मल्लिकाने आंतरराष्ट्रीय स्टार जॅकी चॅनसोबतही काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्लिका एअर होस्टेस म्हणून काम करत असताना पायलट करण गिल सिंहच्या प्रेमात पडली होती. त्या दोघांचे लग्नही झाले होते. मात्र, वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेतला.
संबंधित बातम्या