मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kunal Khemu Birthday: ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर कुणाल खेमूने ४ वर्षांनी मोठ्या सोहासोबत बांधली लग्नगाठ!
Kunal Khemu
Kunal Khemu

Kunal Khemu Birthday: ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर कुणाल खेमूने ४ वर्षांनी मोठ्या सोहासोबत बांधली लग्नगाठ!

25 May 2023, 8:15 ISTHarshada Bhirvandekar

Happy Birthday Kunal Khemu: २५ मे १९८३ रोजी जन्मलेल्या कुणाल खेमूने दूरदर्शनच्या 'गुल गुलशन गुलफाम' या मालिकेतून बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

Happy Birthday Kunal Khemu: बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू आज (२५ मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने यंदा वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. २५ मे १९८३ रोजी जन्मलेल्या कुणाल खेमूने दूरदर्शनच्या 'गुल गुलशन गुलफाम' या मालिकेतून बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्याने 'सर' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यावेळी तो अवघ्या १० वर्षांचा होता. सलमान खान, आमिर खान आणि अजय देवगण यांसारख्या स्टार्ससोबत त्यांनी ‘हम हैं राही प्यार के’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘भाई’, ‘जुडवा’, ‘जख्म’, ‘दुश्मन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

ट्रेंडिंग न्यूज

कुणालने २०१५मध्ये स्वतःपेक्षा चार वर्षांनी मोठ्या अभिनेत्री सोहा अली खानशी लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीत सोहाने कुणालसोबतची तिची प्रेमकहाणी सांगितली होती. सोह म्हणाली, 'मी कुणालला लग्नानंतर नाही तर लग्नाआधीपासूनच ओळखते आहे. मी आणि कुणाल ७ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहोत. जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही चांगली संधी होती. आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेत लग्न केलं. लग्नानंतर माझ्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. सर्व काही पूर्वीसारखेच राहिले आहे. आमच्या नात्याला समाजात मान्यता मिळावी म्हणून लग्न ही केवळ औपचारिकता होती.’

Karan Johar Birthday: ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव; पण अधुरीच राहिली प्रेमकहाणी!

सोहा आणि कुणालची पहिली भेट 'धुंडते रह जाओगे' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेव्हा त्यांच्यात फार कमी बोलणे झाले. पण, या दोघांची खरी प्रेमकथा '९९' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. कुणालने सोहावर जादूच केली होती. तरीही ते फक्त एकमेकांचे मित्रच राहिले. यांनतर सोहा अली खानने आपल्यातील नात्याची घरी कबुली देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पतौडी घराण्यात मुलांबद्दल विषय काढणं तसं कठीणच होतं. मात्र, सोहाची आई कुणालला भेटली आणि तिला तो आवडला.

दोघांनाही आता घरच्यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगावे लागणार होते. मात्र, ही गोष्ट काही सोपी नव्हती. कारण कुणाल त्याच्या पालकांसमोर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही बोलला नव्हता. तर, सोहा ही एका अतिशय कडक शिस्तीच्या कुटुंबातली असल्याने, कुणालबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगणं तिच्यासाठी एक वेगळंच अवघड काम होतं. मात्र, दोघांनी ते यशस्वीपणे पूर्ण केलं. यानंतर सोहा आणि कुणालने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या लग्नाला फक्त खान आणि कपूर कुटुंबीयांनीच हजेरी लावली होती.

विभाग