प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कृष्णा अभिषेक आज (३० मे) त्याचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. ३० मे १९८३ रोजी जन्मलेला कृष्णा याची कॉमेडी सर्वांनाच आवडते, परंतु तो अभिनेता म्हणूनही अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. कृष्णाला त्याच्या व्यावसायिक जीवनात नेहमीच प्रशंसा मिळाली आहे, परंतु त्याचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा वादात सापडले आहे. कृष्णा हा अभिनेता गोविंदाचा भाचा असून, मामा-भाच्यामधील वाद कोणापासून लपून राहिलेले नाहीत. दोन्ही कुटुंबांकडून आतापर्यंत अनेक वक्तव्ये समोर आली आहेत. पण चाहत्यांच्या मनात अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो की, दोघांमधील वाद कुठून सुरू झाला? चला जाणून घेऊया...
कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद कश्मिरा शाहच्या एका ट्विटने सुरू झाला होता. झालं असं की, कृष्णा एक शो करत होता, ज्यात गोविंदाने आधी येण्यास नकार दिला होता. पण, कृष्णाने खूप समजूत घातल्यानंतर अभिनेत्याने होकार दिला. दरम्यान, कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहाने एक ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले की, काही लोक केवळ पैशासाठी नाचतात. गोविंदाची पत्नी सुनीताला कश्मिराचे हे ट्विट आपल्या कुटुंबासाठी असल्याचे वाटले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. कश्मिरा आणि सुनीता यांनी एकमेकांविरोधात अनेक वक्तव्ये केली.
कृष्णाच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गोविंदा आणि सुनीता न आल्याने कृष्णा अभिषेक आणि गोविंदाच्या कुटुंबात सुरू असलेला वाद चांगलाच वाढला होता. यादरम्यान सुनीता म्हणाली होती की, त्यांना या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावण्यात आले नव्हते. पण, कृष्णाने दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी मामा गोविंदा आणि मामी सुनिता यांना पार्टीसाठी आमंत्रित केले होते. या सगळ्यात कृष्णा मामा गोविंदावर रागावला होता. कृष्णाने दावा केला होता की, गोविंदा आपल्या नवजात मुलांना पाहण्यासाठी रुग्णालयात देखील आला नव्हता आणि यामुळे तो आपल्या मामावर रागावला होता. दुसरीकडे, गोविंदाने कृष्णाच्या मुलाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, असे म्हटले होते.
कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद कपिल शर्माच्या शोमध्येही पाहायला मिळाला आहे. एकदा गोविंदा पत्नी सुनीतासोबत कपिलच्या शोमध्ये पोहोचला होता. मात्र, त्या भागात कृष्णा अभिषेक दिसला नाही. मुद्दाम त्याने त्यासिवशी काम करणे टाळले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद सुरू झाला. या घटनेनंतर दोघांमधील भांडण चव्हाट्यावर आले होते. कृष्णा अभिषेकने अनेकदा आपल्याला आपल्या मामाची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय कृष्णा अभिषेकने यापूर्वीही अशी अनेक विधाने केली आहेत, ज्यात त्याने आपल्या मामासोबत संबंध सुधारण्याबाबत चर्चा केली आहे आणि त्यांची माफीही मागितली आहे. नुकताच कृष्णाची बहीण आरती सिंह हिचा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला अभिनेता गोविंदा याने मुलगा यश सोबत हजेरी लावली होती.
संबंधित बातम्या