मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Karan Johar Birthday: ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव; पण अधुरीच राहिली प्रेमकहाणी!
Karan Johar
Karan Johar

Karan Johar Birthday: ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता करण जोहरचा जीव; पण अधुरीच राहिली प्रेमकहाणी!

25 May 2023, 7:32 ISTHarshada Bhirvandekar

Happy Birthday Karan Johar: करण जोहरचं पहिलं आणि शेवटचं प्रेम असलेली ही अभिनेत्री आज एका मोठ्या सुपरस्टारची पत्नी देखील आहे.

Happy Birthday Karan Johar: दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, टॉक शो होस्ट आणि टीव्ही जज, करण जोहर आज (२५ मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांत त्याने अनेक गोष्टी केल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्येच त्याला यश मिळाले आहे. करण जोहर त्याच्या काम आणि चित्रपटांसोबतच अनेकवेळा ट्रोलिंगचाही शिकार झाला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बरीच चर्चा झाली आहे. आज कारण वयाची ५१ वर्ष पूर्ण करत आहे. करण जोहरने अनेकवेळा जाहीरपणे मान्य केले आहे की, त्याचे एका बॉलिवूड अभिनेत्रीवर प्रेम जडले होते. त्याने त्या अभिनेत्रीकडे आपले प्रेमही व्यक्त केले होते. पण त्यांची ही कहाणी अधुरीच राहिली.

ट्रेंडिंग न्यूज

करण जोहरने आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की, त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकाच मुलीवर प्रेम केलं आहे, जिला तो लहानपणापासून ओळखत होता. करण जोहरचं पहिलं आणि शेवटचं प्रेम असलेली ही अभिनेत्री आज एका मोठ्या सुपरस्टारची पत्नी देखील आहे. करणच्या आयुष्यात आलेली ही एकमेव मुलगी ट्विंकल खन्ना आहे.

Butterfly Movie: ‘मेघा’च्या आयुष्यातील रंजक गोष्ट सांगणारं ‘कोरी कोरी झिंग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलगी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने २०१५मध्ये आपले पहिले पुस्तक लाँच केले होते. या कार्यक्रमाला करण जोहर उपस्थित होता. याच दिवशी त्याने स्टेजवर सांगितले होते की, ट्विंकल खन्ना ही एकमेव महिला होती, जिच्यावर तो प्रेम करत होता. नंतर कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये त्याने सांगितले होते की, एक वेळ अशी होती की जेव्हा त्याला वाटले होते की, तो ट्विंकल खन्नाच्या प्रेमात आहे आणि त्याने हे अभिनेत्रीलाही सांगितले देखील होते.

करण जोहर आणि ट्विंकल खन्ना हे बालपणापासूनच मित्र आहेत. दोघेही एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होते. इतकेच नाही, तर करण जोहर जेव्हा 'कुछ कुछ होता है' बनवत होता, तेव्हा त्याने राणी मुखर्जीची म्हणजेच 'टीना'ची भूमिका ट्विंकल खन्नाला ऑफर केली होती. पण, ट्विंकलने करण जोहरची ऑफर नाकारल्याने त्याचे मन दुखावले होते. यानंतर दोघांची ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. तर, ट्विंकल खन्ना हिने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली.

विभाग