Kamal Haasan Birthday : कमल हासनच्या खऱ्याखुऱ्या लव्हस्टोरीवर बनलाय ‘हा’ चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kamal Haasan Birthday : कमल हासनच्या खऱ्याखुऱ्या लव्हस्टोरीवर बनलाय ‘हा’ चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

Kamal Haasan Birthday : कमल हासनच्या खऱ्याखुऱ्या लव्हस्टोरीवर बनलाय ‘हा’ चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

Nov 07, 2024 10:00 AM IST

Happy BirthdayKamal Haasan: कमल हासन यांचेवैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यांची लव्हस्टोरी देखील खूपच वेगळी आहे.

Actor Kamal Haasan
Actor Kamal Haasan

Happy Birthday Kamal Haasan : तरुण वयात अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलेल्या कमल हासनचा आज (७ नोव्हेंबर) ७०वा वाढदिवस आहे. अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त कमल हासन त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत असतात. त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. कमल हासन यांची लव्हस्टोरी देखील खूपच वेगळी आहे. 

कमल हासन यांनी वयाच्या ६व्या वर्षी कलाथूर ‘कन्नम्मा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. पण, ७०च्या दशकात मुख्य अभिनेता म्हणून त्याच्या अभिनयाला सुरुवात झाली आणि ते काही काळातच सुपरस्टार बनला. या काळात त्यांनी साऊथ अभिनेत्री श्रीविद्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी या दोघांचे प्रेमप्रकरण चांगलेच चर्चेत होते. कमल हासन यांची त्यांच्यापेक्षा एक वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्रीसोबतच्या अफेअरची बातमी त्यावेळी ब्रेकिंग न्यूजपेक्षा कमी नव्हती. त्यांच्या प्रेमकथेवर एक मल्याळम चित्रपटही बनवण्यात आला आहे, ज्याचे शीर्षक तिरक्कथा आहे. २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री प्रियामणीने श्रीविद्या आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी कमलची भूमिका साकारली होती. मात्र, काही वर्षांनी कमल आणि श्रीविद्या यांची प्रेमकहाणी संपुष्टात आली. 

Kamal Haasan: गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण

लग्न टिकले नाही!

१९७८मध्ये कमल हासनच्या आयुष्यात डान्सर वाणी गणपतीची एन्ट्री झाली आणि दोघांनी लग्न केलं. त्यांचे नाते अनेक वर्षे चांगले चालले. पण, वाणीला कमल हासन यांच्या अभिनेत्री सारिकासोबतच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची माहिती मिळताच हे लग्न मोडले आणि दोघेही १९८८ मध्ये वेगळे झाले. पहिले लग्न तुटल्यानंतर लगेचच, कमल हासन सारिकाला आपला दुसरा जोडीदार म्हणून निवडले आणि त्यांचे नाते २००४पर्यंत सुरळीत चालू राहिले. पण, १६ वर्षांच्या संसारानंतर कमल हासन यांचे हे दुसरे लग्नही अयशस्वी ठरले. सारिका आणि कमल यांना दोन मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती हासन आणि अक्षरा हासन दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 

कमल हासन यांचे आगामी चित्रपट

यावर्षी, कमल हासन नाग अश्विनच्या पौराणिक आणि विज्ञान कथा चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’मध्ये खलनायकाची भूमिका साकारताना दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा दुसरा भागही येत्या काळात प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये कमल हासन यांची महत्त्वाची भूमिका दिसेल. याशिवाय सलमान खानसोबत कमल हासनच्या एका चित्रपटाचीही चर्चा जोरात सुरू आहे. याशिवाय त्यांचा 'ठग लाईफ' हा आगामी चित्रपटही चर्चेत आहे.

Whats_app_banner