Happy Birthday Javed Jaffrey : अभिनेता जावेद जाफरी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट अभिनेत्यांपैकी एक आहेत. कॉमेडीयन म्हणून त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता त्याच्या नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. तो लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही डान्स शो ‘बूगी वूगी’मध्ये जज म्हणूनही दिसला होता. करिअरच्या बाबतीत त्याने बरीच प्रगती केली. मात्र, त्याला वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. आज जावेद जाफरी यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याचे करिअर, नेट वर्थ आणि त्याच्याशी संबंधित इतर खास गोष्टींवर एक नजर टाकूया.
जावेद जाफरी याने सुभाष घई यांच्या ‘मेरी जंग’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याचे ‘बोल बेबी बोल’ हे गाणे हिट झाले होते. हे गाणे त्यांनी किशोर कुमारसोबत गायल्याचे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
जावेदने त्याचा भाऊ नावेद आणि अभिनेता रवी भेल यांच्यासह ‘बूगी वूगी’ या डान्स टॅलेंट शोचे परीक्षण केले होते, ज्यामुळे तो खूप लोकप्रिय झाला. जवळपास १६ वर्षे तो या शोसोबत काम करत होता.
जावेद जाफरी याने अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच काही चित्रपटांना आवाजही दिला आहे. त्याच्या चांगल्या आवाजामुळे त्याला अनेक शो होस्ट करण्याची संधी मिळाली. कमाईबद्दल बोलायचे झाले तर जाफेद जाफरीची एकूण संपत्ती ५१ कोटी रुपये आहे. जावेद जाफरी याचे मासिक उत्पन्न ४५ लाखांपेक्षा जास्त आहे.
जावेद जाफरीचे एका चित्रपटाचे मानधन २ ते ३ कोटी रुपये आहे. ब्रँड एंडोर्समेंट्स, चित्रपट, शो आणि टीव्ही जाहिराती हा त्याच्या कमाईचा स्रोत आहे. प्रत्येक ब्रँडच्या जाहिरातीसाठी तो ५० ते ६० लाख रुपये आकारतो. जावेद जाफरीचे वार्षिक उत्पन्न ६ कोटींहून अधिक आहे.
अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, जावेद जाफरी याने १९८९ मध्ये झेबा बख्तियारशी (हीना फेम) लग्न केले, परंतु अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. जेबाने प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अदनान सामीसोबत लग्न केले होते. नंतर जावेदने हबीबा जाफरीसोबत लग्नगाठ बांधली.
जावेद जाफरी यांचे वडील जगदीप यांच्याशीही संबंध चांगले नव्हते. जावेदने वडिलांच्या दारू पिण्याच्या आणि जुगार खेळण्याच्या सवयीमुळे नेहमीच त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले होते.
संबंधित बातम्या