Happy Birthday Imran Khan : 'जाने तू या जाने ना', 'मेरे ब्रदर की दुल्हन' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान खान बऱ्याच काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. अनेक दिवसांपासून त्याच्याबद्दल चर्चा होत होती की, तो मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे, परंतु अद्याप अभिनेत्याने या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. आज, १३ डिसेंबर २०२५ रोजी इमरान खान त्यांचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याबद्दलचे काही रंजक किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१३ जानेवारी १९८३ रोजी अमेरिकेत जन्मलेल्या इमरान खानने त्याचे मामा आमिर खान यांच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. यानंतर तो 'जो जीता वही सिकंदर'मध्येही दिसला होता. पण, त्याला खरी ओळख मिळाली ती जेनेलिया देशमुखसोबतच्या 'जाने तू...या जाने ना' या चित्रपटातून, ज्यामध्ये तो मुख्य कलाकार होता.
बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा सुपरस्टार आमिर खानचा भाचा आहे. तो चित्रपटांमध्ये दिसतो, तसा तो खऱ्या आयुष्यातही बबली आहे. इमरान खान हा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. या अभिनेत्याने चक्क मामाची सहकलाकार असणाऱ्या जुही चावला हिला प्रपोज केला होता. काही वर्षांपूर्वी ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने एक पोस्ट शेअर करून हा किस्सा सांगितलं होता. या पोस्टमध्ये जुही चावल म्हणाली की, इमरानने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी तिला प्रपोज केले होते. जुही चावलाने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर इमरान खानचा बालपणीचा फोटो शेअर करत लिहिले की, 'या चिमुकल्या इमरानने मला वयाच्या ६व्या वर्षी प्रपोज केले होते...!!!! याला हिऱ्याची ओळख तेव्हापासून आहे..!!!! माझ्या आजवरच्या सर्वात तरुण प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!! इमरान तुला खूप खूप प्रेम'
'जाने तू... या जाने ना' नंतर इम्रान खानने 'लक', 'आय हेट लव्ह स्टोरीज', 'दिल्ली बेली', 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'एक मैं और एक तू' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी, तो शेवटचा रोम-कॉम चित्रपट 'कट्टी बट्टी' मध्ये कंगना रणौतसोबत दिसला होता. यानंतर अभिनेता मोठ्या पडद्यापासून दुरावला. मात्र, अभिनयानंतर या अभिनेत्याने दिग्दर्शनातही हात आजमावला. २०१८ साली त्याचा 'मिशन मार्स' हा लघुपट आला, जो काही विशेष जादू दाखवू शकला नाही आणि त्यानंतर या अभिनेत्याने मोठ्या पडद्यापासून स्वतःला दूर केले.
संबंधित बातम्या