Happy Birthday Hema Malini: बॉलिवूडची ड्रीमगर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी या आज (१६ ऑकटोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आजही आपल्या सौंदर्याने हेमा मालिनी सगळ्यांना घायाळ करतात. एक काळ असा होता जेव्हा, बॉलिवूडमधील बडे कलाकार देखील हेमा मालिनींचे दिवाने होते. त्यांच्या अभिनयाने आणि नृत्यशैलीने सगळ्यांनाच भुरळ घातली होती. हेमा मालिनी यांचा अभिनेत्री ते राजकारणी बनण्याचा प्रवास देखील यशस्वी ठरला आहे. आज त्या आपला ७५वा वादिवस साजरा करत आहेत. चला तर, जाणून घेऊया हेमा मालिनी यांच्याबद्दल काही खास गोष्टी....
हेमा मालिनी यांच्या जन्म १६ ऑकटोबर १९४८ रोजी झालं होता. त्यांनी चेन्नईतील एका शाळेत १०वीपर्यंतचे शिक्षण घेतले. याच काळात त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स देखील येऊ लागल्या होत्या. याच कारणामुळे त्यांनी लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. हेमा मालिनी यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हेमा मालिनी यांनी १९६१साली आलेल्या तेलुगू चित्रपट 'पांडव वनवासन'मध्ये नर्तिकेची भूमिका साकारली होती.
यानंतर त्यांनी १९६८मध्ये 'सपनो के सौदागर' या हिंदी चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात राज कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील हेमा मालिनी यांचे काम पाहून राज कपूर यांनी भाकित वर्तवले होते की, 'ही मुलगी एक दिवस चित्रपटसृष्टीत मोठी स्टार बनेल'. आणि कालचक्र जसे पुढे सरकले तसे, हे मालिनी यांनी हे भाकित खरे करून दाखवले.
त्यानंतर हेमा मालिनी यांनी १९७०मध्ये 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटात काम केले, जो मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरला होता. हेमा मालिनी यांचा चित्रपट प्रवास 'जॉनी मेरा नाम'पासून खऱ्या अर्थाने सुरू झाला. यानंतर त्यांनी १९७२मध्ये आलेल्या 'सीता और गीता' चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर हेमा मालिनी यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात 'शोले', 'ड्रीमगर्ल', 'सत्ते पे सत्ता' आणि 'किनारा' सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.