वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित! काय होती ती अट? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित! काय होती ती अट? वाचा...

वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित! काय होती ती अट? वाचा...

Jun 07, 2024 07:42 AM IST

एकता कपूरचे नाव ४५ वर्षे वय ओलांडल्यानंतरही ज्या सेलिब्रिटींनी लग्न केले नाही, अशा लोकांच्या यादीत सामील झाले आहे.

वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित!
वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित!

टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणजेच एकता कपूर बद्दल बोलताना तिच्या लग्नाचा उल्लेख हा आवर्जून केलाच जातो. ७ जून १९७५ रोजी जन्मलेली एकता कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या या टप्यावरही एकता कपूरने लग्नाचा कोणताही विचार नाही. काहींचे म्हणणे आहे की, वडिलांच्या काही अटींमुळे तिने लग्न केले नाही. तर, काही लोक म्हणतात की, एकता अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे, ज्यामुळे ती लग्नगाठ बांधण्यास कचरत आहे. सरोगेसीद्वारे एका मुलाची आई बनलेली एकता कपूर अजूनही लग्नाचा विचार करत नाहीये, हे मात्र खरं आहे.

एकता कपूरचे नाव ४५ वर्षे वय ओलांडल्यानंतरही ज्या सेलिब्रिटींनी लग्न केले नाही, अशा लोकांच्या यादीत सामील झाले आहे. अनेकदा मुलाखतींमध्ये तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारले जातात. एकदा अशाच प्रश्नाचे उत्तर देताना तिने सलमान खानचा संदर्भ दिला होता. एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं होतं की, ती लग्न कधी करणार? यावर एकता हसत म्हणाली होती की, जेव्हा सलमान खान लग्न करेल तेव्हा, दोन-तीन वर्षांनी तीही लग्न करेल.

Tharala Tar Mag 6 June: सायली अर्जुनला बाळाची स्वप्न रंगवताना पाहून कल्पना सुखावणार! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट

वडिलांच्या अटीमुळे लग्न केले नाही?

जेव्हाही एकता कपूरच्या लग्नाचा उल्लेख केला जातो, तेव्हा तिच्या वडिलांची एक अट निश्चितपणे नमूद केली जाते. या अटीमुळे एकता कपूर आजपर्यंत अविवाहित असल्याचेही मानले जात आहे. एकता कपूरनेही एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. एकता म्हणाली होती, 'पप्पा म्हणाले होते की तू लग्न कर किंवा काम कर. मी यापैकी केवळ काम निवडले. मी माझ्या अनेक मित्रांची लग्ने आणि घटस्फोट पाहिले आहेत. कदाचित हेच कारण आहे की मी अजूनही खऱ्या प्रेमाची वाट पाहत आहे.’

एकता कपूर पडली होती अभिनेत्याच्या प्रेमात!

एकता कपूरनेही एकदा तिच्या क्रशचा उल्लेख केला होता. सोशल मीडियावर एका स्टारचा फोटो शेअर करताना तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. हा स्टार दुसरा कोणी नसून चंकी पांडे होता. एकता कपूरने एकदा चंकी पांडेच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर फोटो शेअर केला होता. तसंच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'काही वर्षांपूर्वी चंकी पांडेवर माझं प्रेम होतं. जर त्याने होकार दिला असता, तर मीही आज बॉलिवूड वाईफ झाले असते.’ याशिवाय एकताचे नाव करण जोहरशीही अनेकदा जोडले गेले. एका मुलाखतीत करण जोहरने सांगितले होते की, जर एकता आणि मला कुणीही सापडले नाही, तर आम्ही दोघेच एकमेकांशी लग्न करू. मात्र, एकताने या नात्यावर कधीही भाष्य केले नाही.

Whats_app_banner