'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या २०१६मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावणाऱ्या दिशा पाटनीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. पहिल्या चित्रपटापासूनच तिने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, त्यातील काही हिट तर काही फ्लॉप ठरले. मात्र, दिशा केवळ तिच्या चित्रपटांमुळेच चर्चेत नाही, तर ती तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत असते. ही अभिनेत्री आज म्हणजेच १३ जून रोजी तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशा पाटनीचे वडील जगदीश सिंह पाटनी एक पोलीस अधिकारी आहेत. तर, तिची आई आरोग्य निरीक्षक आहे. तिची मोठी बहीण खुशबू पाटनी ही भारतीय सैन्यात आहे. या खास निमित्ताने जाणून घेऊया दिशाच्या संबंधितले काही न ऐकलेले किस्से...
दिशा पाटनीचे आज सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. पण, फार कमी लोकांना माहित आहे की दिशाला अभिनय क्षेत्रात कधीच प्रवेश करायचा नव्हता. तर, तिला एअरफोर्स पायलट व्हायचे होते. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला होता. दिशाने एकदा बाजार इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती आणि त्यादरम्यान तिच्या एका मैत्रिणीने तिला मॉडेलिंग स्पर्धेबद्दल सांगितले. या मॉडेलिंग स्पर्धेत जिंकणाऱ्या विजेत्या स्पर्धकाला मुंबईला घेऊन जाण्यात येणार होते. त्यावेळी मुंबईला जाणे हे देखील सगळ्यांचे स्वप्न असायचे, असे दिशा म्हणाली. मुंबईला जायला मिळावं म्हणून दिशाने अर्ज केला आणि ती ही स्पर्धा जिंकली. यानंतर तिला एका एजन्सी भेटली आणि तिथून तिचा फिल्मी प्रवास सुरू झाला.
'मिड डे'शी बोलताना अभिनेत्रीने एकदा स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असताना दिशा पाटनी डोक्यावर पडली आणि त्यादरम्यान तिला खूप गंभीर दुखापत झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. ही दुखापत इतकी गंभीर होती की, सहा महिने तिची स्मरणशक्तीही गेली. ते स्वतःसह इतरांना देखील ओळखू शकत नव्हती. मात्र, अतिशय जिद्दीने तिने या परिस्थितीशी लढा दिला.
सुशांत सिंह राजपूतसोबत मोठ्या पडद्यावर डेब्यू करणारी अभिनेत्री दिशा पाटनी 'कुंग फू योगा', 'वेलकम टू द न्यूयॉर्क', 'बागी २', 'भारत', 'मलंग', 'राधे', 'एक व्हिलन रिटर्न्स', 'योद्धा'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.
संबंधित बातम्या