मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone Birthday: वयाच्या ९व्या वर्षी मॉडेलिंग सुरू करणाऱ्या दीपिकानं अर्धवट सोडलं होतं शिक्षण! वाचा...

Deepika Padukone Birthday: वयाच्या ९व्या वर्षी मॉडेलिंग सुरू करणाऱ्या दीपिकानं अर्धवट सोडलं होतं शिक्षण! वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 04, 2024 08:56 PM IST

Happy Birthday Deepika Padukone: दीपिका पदुकोण हिने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. या दरम्यान दीपिका बॅडमिंटन देखील खेळत होती.

Happy Birthday Deepika Padukone
Happy Birthday Deepika Padukone

Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पदुकोण ५ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आपल्या १५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास ३५हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिका पदुकोण हिने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. या दरम्यान दीपिका बॅडमिंटन देखील खेळत होती. मात्र, दहावीनंतर दीपिकाने बॅडमिंटन सोडून पूर्णपणे मॉडेलिंगला सुरुवात केली. यानंतर दीपिका पदुकोण अनेक जाहिरातींमध्ये झळकली होती.

कॉलेजमध्ये असताना दीपिकाकडे अनेक जाहिरातींच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. या दरम्यान दीपिकाकडे मॉडेलिंगचे काम इतके होते की, तिने तिचे समाजशास्त्रातील शिक्षणच अर्धवट सोडली. २००५मध्ये दीपिकाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये एन्ट्री केली. इतकच नाही तर, पहिल्याच वर्षात तिने ‘मॉडेल ऑफ द इयर’चा पुरस्कार पटकावला. यानंतर तिला ‘किंगफिशर कॅलेंडर’मध्ये स्थान मिळालं. या कॅलेंडरमध्ये झळकल्यानंतर दीपिका मॉडेलिंगच्या जगात खूप लोकप्रिय झाली.

Deepika Padukone: दीपिका पदुकोणने आई होण्यासंदर्भात घेतला मोठा निर्णय! खुलासा करत म्हणाली...

दीपिका वयाच्या २१व्या वर्षी बंगळुरूहून मुंबईत आली. यावेळी तिला हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. दीपिका पदुकोणसाठी ही पहिलीच संधी होती. दीपिकाने २००६मध्ये ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दरम्यान, फराह खान तिच्या आगामी चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. आता नवा चेहरा शोधावा कुठून असा प्रश्न तिला पडला होता. त्यावेळी तिला तिच्या मैत्रिणीने फॅशन कोरिओग्राफर वंडल रॉडरिककडे याबद्दल चौकशी करण्यासाठी सांगितले. वंडल त्यावेळी दीपिकाचा मॉडेलिंग मेंटॉर होता, त्यामुळे त्याने लगेच दीपिकाचे नाव सुचवले.

दीपिकाच्या कामाने प्रभावित होऊन फराहने तिला आपल्या चित्रपटात कास्ट केले. याआधी दीपिकाची कास्टिंग ‘हॅप्पी न्यू इयर’साठी होती. परंतु, जेव्हा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला, तेव्हा फराह खानने दीपिकासोबत ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट बनवला. या पहिल्या चित्रपटासाठीच तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटापासून सुरू झालेला दीपिका पदुकोण हिचा हा प्रवास आजही धडाक्यात सुरू आहे.

WhatsApp channel

विभाग