Boman Irani Birthday: हॉटेल वेटर ते बॉलिवूड अ‍ॅक्टर; 'असा' होता बोमन इराणी यांचा फिल्मी प्रवास...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Boman Irani Birthday: हॉटेल वेटर ते बॉलिवूड अ‍ॅक्टर; 'असा' होता बोमन इराणी यांचा फिल्मी प्रवास...

Boman Irani Birthday: हॉटेल वेटर ते बॉलिवूड अ‍ॅक्टर; 'असा' होता बोमन इराणी यांचा फिल्मी प्रवास...

Dec 02, 2023 07:44 AM IST

Happy Birthday Boman Irani: मनोरंजन विश्वात येऊन अभिनेता बनायचे असे बोमन इराणी यांनी कधीच ठरवले नव्हते.

Boman Irani Birthday
Boman Irani Birthday

Happy Birthday Boman Irani: बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी हे मनोरंजन विश्वातील एक मोठे प्रसिद्ध नाव आहे. पडद्यावर साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेशी एकरूप होऊन काम करणारा अभिनेता म्हणून बोमन इराणी यांचं नाव घेतलं जातं. 'थ्री इडियट्स'चा 'व्हायरस' असो की 'मुन्नाभाई एमबीबीएस'चा डॉक्टर अस्थाना, ते प्रत्येक भूमिकेशी सहज जुळवून घेतात. बोमन यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा इतक्या चोखंदळपणे साकारल्या आहेत, की सगळेच त्यांच्या अभिनयाचे दिवाने झाले आहेत.

मनोरंजन विश्वात येऊन अभिनेता बनायचे असे बोमन इराणी यांनी कधीच ठरवले नव्हते. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी बोमन इराणी यांना फोटोग्राफर बनायचे होते. बोमन इराणी फोटोग्राफीची इतकी आवड होती की, आजूबाजूला घडणार प्रत्येक क्षण ते कॅमेऱ्यात टिपत असत. त्यांच्या फोटोग्राफीच्या आवडीमुळे त्यांना पहिल्यांदा पुण्यात बाइई रेस फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना फोटोग्राफर म्हणून मुंबईत झालेल्या 'बॉक्सिंग वर्ल्ड कप'चे कव्हर करण्याची संधी मिळाली.

Shahrukh Khan Apology: हात जोडून शाहरुखने मागितली गायक किंगची माफी, काय आहे नेमके प्रकरण?

या सगळ्या आधी बोमन इराणी नोकरी करत होते. बोमन इराणी यांनी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस कर्मचारी म्हणून २ वर्षे काम केले आहे, मात्र, नंतर काही कारणांमुळे बोमन यांना ती नोकरी सोडावी लागली. हॉटेलमधील नोकरी सोडल्यानंतर ते आपल्या आईच्या बेकरीमध्ये काम करू लागले होते. इथेच त्यांची भेट एका सुंदर तरुणीशी झाली आणि त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली.

बेकरीमध्ये काम करत असतानाच बोमन इराणी यांची ओळख प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्याशी झाली. या भेटीने बोमन यांच्या नशिबाचे तारे चमकले. श्यामक दावर यांनीच बोमन इराणी यांना थिएटरमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. श्याम यांचा सल्ला ऐकून बोमन इराणी यांनी अभिनय प्रवासाची सुरुवात केली. थिएटरमध्ये काम करत असतानाच २००१मध्ये 'एव्हरीबडी सेज आय एम फाइन' आणि 'लेट्स टॉक' या दोन चित्रपटांतुन त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. २००३मध्ये आलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. यानंतर बोमन इराणी यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Whats_app_banner